ETV Bharat / sitara

जागतिक मराठी अकादमी संमेलन: पाहा चित्र, शिल्प आणि काव्याचा तिहेरी संगम - चित्र, शिल्प आणि काव्याचा तिहेरी संगम

यावेळी प्रसिद्ध, नामवंत कवी यांच्याही सुमधुर, विविध विषयाशी निगडित असलेल्या कविता ऐकण्याचा अनुभव रसिक प्रेक्षकांनी घेतला. शिल्पकार चंद्रजित यादव यांनी अभिनेता, दिगदर्शक, लेखक, निर्माते नागराज मंजुळे यांचे शिल्पचित्र तर मनोजकुमार साकळे यांनी प्रसिद्ध वात्रटिका कवी, माजी आमदार रामदास फुटाणे यांचे चित्र काढून रसिकांना चकित केले.

Painting, sculpture and poetry in World marathi acadamy in alibag
जागतिक मराठी अकादमी संमेलन: पाहा चित्र, शिल्प आणि काव्याचा तिहेरी संगम
author img

By

Published : Jan 10, 2020, 9:03 AM IST

Updated : Jan 10, 2020, 10:39 AM IST

रायगड - आपली कविता सादर करत असताना त्यासोबतच शिल्पकला आणि चित्रकला सादर करण्याच्या अनोख्या कलेचा अनुभव अलिबागकरांना अनुभवायला मिळाला. निमित्त होतं जागतिक मराठी अकादमीचे 'शोध मराठी मनाचा' या संमेलनाचे. या संमेलनात जगप्रसिद्ध शिल्पकार चंद्रजित यादव आणि सांगलीचे सुप्रसिद्ध चित्रकार मनोजकुमार साकळे यांनी आपली कला सादर केली.

यावेळी प्रसिद्ध, नामवंत कवी यांच्याही सूमधूर, विविध विषयाशी निगडित असलेल्या कविता ऐकण्याचा अनुभव रसिक प्रेक्षकांनी घेतला. शिल्पकार चंद्रजित यादव यांनी अभिनेता, दिगदर्शक, लेखक, निर्माते नागराज मंजुळे यांचे शिल्पचित्र तर मनोजकुमार साकळे यांनी प्रसिद्ध वात्रटिका कवी, माजी आमदार रामदास फुटाणे यांचे चित्र काढून रसिकांना चकित केले.

जागतिक मराठी अकादमी संमेलन: पाहा चित्र, शिल्प आणि काव्याचा तिहेरी संगम

हेही वाचा -नव्या वर्षात राणादा,अंजलीबाईंचा नव्या वास्तुत प्रवेश, वसगडे ऐवजी केर्लीत होतंय शूटींग

अलिबाग पीएनपी नाट्यगृहात ३ दिवसीय जागतिक मराठी अकादमीचे शोध मराठी मनाचा संमेलन आयोजित केले होते. या संमेलनात चित्र, शिल्प, काव्य हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात राजेंद्र पाटील, रवींद्र साळवे, आशुतोष आपटे, महेश केळुस्कर, दिलीप पांढरपट्टे, अशोक नायगावकर, एल बी पाटील, दुर्गेश सोनार, अरुण म्हात्रे, वैभव जोशी हे कवी तर शिल्पकार चंद्रजित यादव, चित्रकार मनोजकुमार साकळे सहभागी झाले होते.

चित्र, शिल्प आणि काव्य हा तिहेरी संगम असलेल्या कलाकारांचा हा कार्यक्रम होता. यामध्ये नामवंत कवींनी आपल्या कविता सादर केल्या. एकीकडे नामवंत कवींच्या कवितेचा बहर आलेला असताना शिल्पकार चंद्रजित यादव हे नागराज मंजुळे यांचे शिल्प तर मनोजकुमार साकळे यांनी रामदास फुटाणे यांचे चित्र तयार केले. नामवंत कवींच्या कविता, शिल्पकार आणि चित्रकार यांच्या कलेने रसिकांना स्तब्ध केले.

हेही वाचा -Exclusive : वसगडेच्या वाड्यातून अंजलीबाई-राणादाचं शिफ्टिंग, चित्रीकरणाचं ठिकाण बदललं

Intro:जागतिक मराठी अकादमी संमेलन

चित्र, शिल्प, काव्य कार्यक्रमात दिसला तिहेरी संगम

जगप्रसिद्ध शिल्पकार चंद्रजित यादव यांनी तयार केले नागराज मंजुळे यांचे शिल्प

चित्रकार मनोजकुमार साकळे यांनी साकारले रामदास फुटाणे यांचे चित्र

रायगड : कवी आपली कविता सादर करीत असताना त्यासोबत शिल्पकला आणि चित्रकला सादर करण्याचा अनोख्या कलेचा अनुभव अलिबाग करांना अनुभवास मिळाला. निमित्त होत जागतिक मराठी अकादमी शोध मराठी मनाचा या संमेलनात जगप्रसिद्ध शिल्पकार चंद्रजित यादव आणि सांगलीचे सुप्रसिद्ध चित्रकार मनोजकुमार साकळे यांनी आपली कला सादर केली. यावेळी प्रसिद्ध, नामवंत कवी यांच्याही सुमधुर, विविध विषयाशी निगडित असलेल्या कविता ऐकण्याचा अनुभव रसिक प्रेक्षकांनी घेतला. शिल्पकार चंद्रजित यादव यांनी अभिनेता, दिगदर्शक, लेखक, निर्माते नागराज मंजुळे यांचे शिल्पचित्र तर मनोजकुमार साकळे यांनी प्रसिद्ध वात्रटिका कवी, माजी आमदार रामदास फुटाणे यांचे चित्र काढून रसिकांना चकित केले.

Body:अलिबाग पीएनपी नाट्यगृहात तीन दिवसीय जागतिक मराठी अकादमीचे शोध मराठी मनाचा संमेलन आयोजित केले होते. या संमेलनात चित्र, शिल्प, काव्य हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात राजेंद्र पाटील, रवींद्र साळवे, आशुतोष आपटे, महेश केळुस्कर, दिलीप पांढरपट्टे, अशोक नायगावकर, एल बी पाटील, दुर्गेश सोनार, अरुण म्हात्रे, वैभव जोशी हे कवी तर शिल्पकार चंद्रजित यादव, चित्रकार मनोजकुमार साकळे सहभागी झाले होते.
Conclusion:चित्र, शिल्प, काव्य हा तिहेरी संगम असलेल्या कलाकारांचा हा कार्यक्रम होता. यामध्ये नामवंत कवींनी आपल्या कविता सादर केल्या. एकीकडे नामवंत कवींच्या कवितेचा बहर आलेला असताना शिल्पकार चंद्रजित यादव हे नागराज मंजुळे यांचे शिल्प तर मनोजकुमार साकळे यांनी रामदास फुटाणे यांचे चित्र तयार केले. नामवंत कवींच्या कविता, शिल्पकार आणि चित्रकार यांच्या कलेने रसिकांना स्तब्ध केले.
Last Updated : Jan 10, 2020, 10:39 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.