मुंबई - बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम आपल्या आगामी 'पागलपंती' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. 'पागलपंती' हा एक मल्टीस्टारर चित्रपट आहे. कॉमेडी ड्रामा असलेल्या 'पागलपंती' चित्रपटातील या सर्व कलाकारांचे फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आले आहेत. चित्रपटाच्या प्रत्येक पोस्टरमध्ये प्रत्येक कलाकाराचं पात्र नेमकं कसं आहे, याची झलक पाहायला मिळते. प्रत्येकजण यामध्ये 'पागलपंती' करताना दिसतो. त्यामुळे चाहत्यांना ट्रेलरची आतुरता आहे.
चित्रपटाचं फर्स्ट पोस्टरही प्रदर्शित करण्यात आलं आहे. तसेच आज म्हणजे २२ ऑक्टोबरला या चित्रपटाचा ट्रेलरही पाहायला मिळणार आहे.
हेही वाचा -'तानाजी - द अनसंग वॉरिअर'चा फर्स्ट लूक प्रदर्शित, प्रदर्शनाची तारीख जाहीर
या चित्रपटाच्या निमित्ताने जॉन बऱ्याच दिवसानंतर कॉमेडी चित्रपटात भूमिका साकारत आहे. दिग्दर्शक अनिस बज्मी हे या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. तर, भूषण कुमार, कृष्ण कुमार, मंगत पाठक, अभिषेक पाठक यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. लंडन आणि लीडस यांसारख्या ठिकाणी या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण करण्यात आलं
हेही वाचा -रेहासोबत सिक्रेट हॉलिडेवर गेलाय सुशांत, फोटोंनी उलगडलं गुपीत
यात जॉनशिवाय इलियाना डिक्रुझ, अनिल कपूर, अर्शद वारसी, उर्वशी रौतेला, सौरभ शुक्ला, क्रिती खारबंदा आणि पुलकीत सम्राट या कलाकारांच्याही महत्तावाच्या भूमिका असणार आहेत. २२ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होईल.
-
#Pagalpanti trailer drops today... New posters... 22 Nov 2019 release. #PagalpantiTrailer pic.twitter.com/oM4sWZwkWG
— taran adarsh (@taran_adarsh) October 22, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#Pagalpanti trailer drops today... New posters... 22 Nov 2019 release. #PagalpantiTrailer pic.twitter.com/oM4sWZwkWG
— taran adarsh (@taran_adarsh) October 22, 2019#Pagalpanti trailer drops today... New posters... 22 Nov 2019 release. #PagalpantiTrailer pic.twitter.com/oM4sWZwkWG
— taran adarsh (@taran_adarsh) October 22, 2019