ETV Bharat / sitara

नववधु नुसरत जहांची संसदेत उपस्थिती, बंगाली भाषेत घेतली शपथ - nikhil jain

नुसरतने बंगाली भाषेत शपथ घेतली. तिने तृणमुल काँग्रेसच्या तिकीटावर बशीरहाट मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. यामध्ये तिने विजय मिळवला. तिच्यासोबतच मिमी चक्रवर्तीनेदेखील शपथ घेतली.

नुसरत जहां
author img

By

Published : Jun 25, 2019, 12:53 PM IST

नवी दिल्ली - बंगाली अभिनेत्री नुसरत जहांने लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर काही दिवसांपूर्वीच निखील जैनसोबत लग्नगाठ बांधली. तिच्या लग्नासाठी ती टर्की येथे गेली होती. त्यामुळे ती संसदेत शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहू शकली नव्हती. अलिकडेच ती लग्न करुन भारतात परतली आहे. भारतात परतताच तिने संसद भवनात हजेरी लावली. माथ्यावर सिंदुर आणि हातावर मेहंदी अशा नववधुच्या रुपात तिने खासदार पदाची शपथ घेतली. तिचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Nusrat Jahan reach at loksabha for swering after wedding ceremony
नुसरत जहां

नुसरतने बंगाली भाषेत शपथ घेतली. तिने तृणमुल काँग्रेसच्या तिकीटावर बशीरहाट मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. यामध्ये तिने विजय मिळवला. तिच्यासोबतच मिमी चक्रवर्तीनेदेखील शपथ घेतली.

निवडणूका पार पडल्यानंतर तिने उद्योगपती असलेल्या निखील जैनसोबत लग्नगाठ बांधली. तिच्या डेस्टीनेशन वेडींगसाठी ती टर्की येथे गेली होती. १९ जूनला तिचा विवाहसोहळा पार पडला. नुसरतच्या लग्नाचे फोटोदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.