ETV Bharat / sitara

‘बॅक टू स्कुल' च्या निमित्ताने निशिगंधा वाडचे मराठी चित्रपटांत पुनरागमन! - निशिगंधा वाड ‘बॅक टू स्कुल' चित्रपटात

'बॅक टू स्कुल' सिनेमाचा मुहूर्त नुकताच दिमाखात पार पडला. या सिनेमाच्या निमित्ताने निशिगंधा वाड बऱ्याच दिवसांनी मराठी चित्रपटात दिसणार आहे. या सिनेमाचे वैशिष्ट्य म्हणजे सोनाली गव्हाणे, मेघराज भोसले आणि महेश लांडगे या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

-back-to-school
'बॅक टू स्कुल' सिनेमाचा मुहूर्त
author img

By

Published : Apr 10, 2021, 2:40 PM IST

सध्या मिनी-लॉकडाऊन लागलेला असला तरी मनोरंजनसृष्टीत बऱ्याच घडामोडी घडतंच आहेत. आता जरी चित्रीकरणांना ब्रेक लागलेला असला तरी आधी केलेली कामं प्रेक्षकांसमोर येतं आहेत. काही महिन्यांपूर्वी 'बॅक टू स्कुल' या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. सोबतच या सिनेमाचे पोस्टर देखील प्रदर्शित करण्यात आले होते. आता 'बॅक टू स्कुल' सिनेमाचा मुहूर्त नुकताच दिमाखात पार पडला.

-back-to-school
'बॅक टू स्कुल' सिनेमाचा मुहूर्त

मुंबईत झालेल्या या सोहळ्याला कलाकारांसोबतच अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले आणि विद्यमान आमदार महेश लांडगे तसेच नगरसेविका सोनाली गव्हाणे उपस्थित होते. या सिनेमाचे वैशिष्ट्य म्हणजे सोनाली गव्हाणे, मेघराज भोसले आणि महेश लांडगे या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

-back-to-school
'बॅक टू स्कुल' सिनेमाचा मुहूर्त

सिनेमाचे पोस्टर आणि नावावरून हा सिनेमा नक्कीच शाळेच्या अविस्मरणीय आणि गोड आठवणींना उजाळा देणारा असणार हे तर नक्की. रंगसंस्कार प्रॉडक्शनच्या 'बॅक टू स्कुल' या सिनेमाचे दिग्दर्शन सतिश महादु फुगे यांनी केले असून पटकथा आणि लेखन अमित नंदकुमार बेंद्रे आणि सतीश महादू फुगे यांचे आहे. श्रीनिवास गायकवाड छायाचित्रण दिग्दर्शक केले आहे. रंगसंस्कार प्रोडक्शन हाऊसने यापूर्वी 'रामप्रहर' नावाचा सिनेमा केला असून तो २०२१ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

-back-to-school
'बॅक टू स्कुल' सिनेमाचा मुहूर्त

या सिनेमात सौरभ गोखले, निशिगंधा वाड, स्नेहा चव्हाण (विश्वासराव), सुरेश विश्वकर्मा, श्वेता पगार, आधिश पायगुडे, विपीन बोराटे, चंद्रकांत कुऱ्हाडे, सोमनाथ रसाळ, नितीन बनसोडे, अमृत झांबरे, अभिजित पटणे, रुपाली पाथरे, किरण झांबरे, डॉ परिणिता पावसकर, मोहिनी कुडेकर, श्वेता कामत, सुप्रिया मागाडे, यशा पाळणकर, भूमी दळी आणि ईशा आगरवाल आदी अनेक कलाकार भूमिका निभावताना दिसणार आहे. शुभांगी सतीश फुगे आणि सतिश महादु फुगे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे, तर सहनिर्माता आहे हनुमंत नाडेकर.

-back-to-school
'बॅक टू स्कुल' सिनेमाचा मुहूर्त

‘बॅक टू स्कुल' या सिनेमाच्या निमित्ताने निशिगंधा वाड बऱ्याच दिवसांनी मराठी चित्रपटात दिसणार आहे.

हेही वाचा - आमिर खानची मुलगी इरा करतेय मराठमोळ्या नुपुर शिखरेशी डेटिंग

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.