मुंबई - अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची मुख्य भूमिका असलेला 'विक्की वेलिंगकर' या चित्रपटाविषयी चाहत्यांमध्ये बरीच उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला आहे. तसेच यातील 'टीकी टीकी टॉक' हे गाणंदेखील यापूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. आता या चित्रपटातील ‘डा रा डिंग डिंग ना’ हे दुसरं गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे.
विक्की वेलिंगकर या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, स्पृहा जोशी, विनिता खरात, केतन सिंग, जुई पवार, गौरव मोरे, संग्राम समेळ आणि रमा जोशी या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट ६ डिसेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
हेही वाचा -'मिनी मुव्ही मँनिया'मध्ये गोवा विभागात 'राँग' तर राष्ट्रीय विभागात 'अडगळ' ठरले विजेते
'विक्की वेलिंगकर’ चित्रपटाचं ‘डा रा डिंग डिंग ना’ हे गाणं पीयूष अंभोरे याने गायले आणि लिहिले असून मनन मुंजाळ याने संगीतबद्ध केले आहे. या गाण्यामध्ये सोनाली कुलकर्णी म्हणजेच 'विक्की' कोणाचा तरी शोध घेताना दिसते. या गाण्यात मास्क मॅन देखील पाहायला मिळतो. या गाण्याचा संपूर्ण मूड पूर्णपणे क्लब प्रकारचा आहे. हे गाणे तरुणाईला ठेका धरायला लावेल आणि तरुण मुलामुलींना आवडेल असे हे गाणे आहे.
हेही वाचा -'द गर्ल ऑन द ट्रेन'च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर, 'या' चित्रपटाशी होणार टक्कर