ETV Bharat / sitara

प्रथमेश परबचं 'आपला हात जगन्नाथ' हे 'टकाटक' गाणं प्रदर्शित - dance song

आपला हात जगन्नाथ असं या गाण्याचं शीर्षक आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. हा ट्रेलर अल्पावधीतच चर्चेचा विषय ठरल्यानंतर आता हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे.

'आपला हात जगन्नाथ' गाणं प्रदर्शित
author img

By

Published : May 30, 2019, 5:13 PM IST

मुंबई - हिंदी सिनामांचं अनुकरण करण्यासाठी आणि वेब सिरीजच्या जमान्यात टिकून राहण्यासाठी मराठी सिनेमाने कात टाकून बोल्ड विषयावर सिनेमे बनवायला सुरुवात केली आहे. मिलिंद कवडे दिग्दर्शित 'टकाटक' हा त्याच मालिकेतील पुढचा सिनेमा म्हणायला हवा. या सिनेमातील नवं गाणं नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे.

'आपला हात जगन्नाथ' असं या गाण्याचं शीर्षक आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. हा ट्रेलर अल्पावधीतच चर्चेचा विषय ठरल्यानंतर आता हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. या गाण्याला आनंद शिंदे यांनी आवाज दिला आहे तर वरूण लिखाते यांचं संगीत आहे.

जय अत्रे लिखित या गाण्यात टाईमपास फेम प्रथमेश परबचा खास डान्स पाहायला मिळत आहे. चित्रपटात प्रथमेशची जोडी रितिका श्रोत्री या नवोदित अभिनेत्रीसोबत जमली आहे. त्यामुळं प्रेक्षकांना एका नव्या कोऱ्या जोडीची ‘टकाटक’ केमिस्ट्रीही या चित्रपटात अनुभवायला मिळेल. येत्या २८ जूनला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.