मुंबई - बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी लवकरच एका क्राईम थ्रिलर चित्रपटात झळकणार आहे. 'रात अकेली है' असे या चित्रपटाचे नाव आहे. नवाजने या चित्रपटाचे शूटिंगही पूर्ण केले आहे. 'रात अकेली है' या चित्रपटात नवाजुद्दीनसिद्दीकी सोबत अभिनेत्री राधिका आपटे आणि श्वेता त्रिपाठी शर्मादेखील झळकणार आहे.
या चित्रपटाच्या माध्यमातून हनी तेरहान हे दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. त्यांच्यासोबत काम करताना मजा आली, असे ट्विट नवाजुद्दीन सिद्दीकीने केले आहे.
श्वेता त्रिपाठी आणि नवाजुद्दीनने 'हरामखोर' चित्रपटातही एकत्र भूमिका साकारली होती. नवाजुद्दीनसोबत पुन्हा एकदा काम करण्याची संधी मिळाल्यामुळे स्वत:ला भाग्यवान समजते, असे तिने एका माध्यमाशी बोलताना म्हटले आहे.
या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, एका क्राईम चित्रपटात नवाजुद्दीनची भूमिका कशी असेल, याची चाहत्यांना उत्सुकता आहे.