मुंबई - मनिरत्नम आणि जयेंद्र पंचपकेसन यांनी निर्मिती असलेल्या नवरसा या नऊ लघु चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट म्हणजे तमिळ मनोरंजन इंडस्ट्रीच्या सांस्कृतिक अभिमानाचा भाग मानला जातो. एक सुंदर आणि आकर्षक अशा नऊ विषयावरील हा एक वास्तववादी चित्रपट आहे. ट्रेलर पाहून या विषयाबद्दलची उत्कंठा खूपच वाढली आहे.
मंगळवारी सकाळी नेटफ्लिक्स इंडियाने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडल्सवर नवरसाचा ट्रेलर रिलीज केला. हा ट्रेलर रिलीज होताच ट्विटरवर ट्रेलर ट्रेंडिंग व्हायला लागला.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
नवरसा चित्रपटाची संकल्पना प्रामुख्याने नऊ रस किंवा भावनांवर आधारित आहे. थीमच्या अनुषंगाने, नऊ शॉर्ट फिल्म नऊ भावनांच्या कथा सांगतील - राग, करुणा, धैर्य, तिरस्कार, भीती, हशा, प्रेम, शांतता आणि आश्चर्य. अरविंद स्वामी, बेजॉय नंबियार, गौतम वासुदेव मेनन, कार्तिक सुब्बराज, कार्तिक नरेन, के.व्ही. आनंद, पोनराम, राठींद्रन प्रसाद आणि हलिता शमीम हे या नवरसातील विशिष्ट दृष्टीकोन पुढे आणण्यासाठी सरसावले आहेत.
या नवरसाच्या लघुपटांमध्ये 40 हून अधिक आघाडीचे कलाकार आणि शंभरहून अधिक सर्जनशील चित्रपट तंत्रज्ञ आपले कौशल्य दाखवणार आहेत. कोविड काळामध्ये नुकसान झालेल्या तमिळ फिल्म इंडस्ट्रीला पाठिंबा देण्यासाठी या चित्रपटाचे कलाकार, तंत्रज्ञ आणि क्रू मेंबर्स आपली सेवा देत आहेत. नवरसा चित्रपटाचा प्रीमियर 6 ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर होणार आहे.