मुंबई - मराठी अभिनेता नाना पाटेकर यांच्या मातोश्रींचे तीन महिन्यांपूर्वी निधन झाले. निश्चित आईशिवाय पहिला मदर्स डे त्यांच्यासाठी कठीण असणार आहे. अशात नानांनी स्वतः सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपल्या जीवनात आईच्या जाण्याने झालेले बदल सांगितले आहेत.
केवळ दोन ओळींचं नानांचं ही ट्विट भावूक करणारं आहे. आई तीन महिन्यांपूर्वी गेली आणि मी अचानक मुलाचा, म्हातारा झालो. आता कोणी दम देत नाही, असे म्हणत त्यांनी आपल्या आईबद्दलचं प्रेम आणि आईची उणीव बोलून दाखवली आहे. नानांची आई निर्मला पाटेकर यांचे जानेवारीत वृद्धापकाळाने निधन झाले आहे.