ETV Bharat / sitara

New Marathi Movie Release : 'नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा' 15 जानेवारीला होणार प्रदर्शित - नवीन मराठी चित्रपट

महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा' हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. गिरणी कामगारांच्या संपानंतर जगण्यासाठीची धडपड, हार न मानण्याचा मराठी बाणा, यात मांडण्यात आले आहेत.

New Marathi Movie
नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा
author img

By

Published : Jan 9, 2022, 7:22 PM IST

मुंबई - कोरोना विषाणूचा नवीन प्रकार ओमायक्रॉन मुळे देशात कोव्हीडची तिसरी लाट येण्याची संभावना आहे.दररोज वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे दिल्ली सरकारने तेथील चित्रपटगृहे बंद केली आहेत. त्यामुळे बऱ्याच हिंदी चित्रपटांचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. लवकरच महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा' हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. गिरणी कामगारांच्या संपानंतर जगण्यासाठीची धडपड, हार न मानण्याचा मराठी बाणा, लेखक जयंत पवार यांच्या धारदार लेखनशैलीद्वारे कथेमध्ये निर्माण झालेल्या हृदयभेदी नाट्यानं मांजरेकरांना आकर्षित केलं होतं. त्यातून 'नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा' या चित्रपटाची निर्मीती झाली.

New Marathi Movie
15 जानेवारीला होणार प्रदर्शित
'अठरा वर्षांवरील प्रेक्षकहो, दम असेल तरच थेटरात येऊन बघायचं...' ही त्याच्या पोस्टरवरील ओळही लक्ष वेधून घेते. यात प्रेम धर्माधिकारी, वरद नागवेकर, छाया कदम, शशांक शेंडे, रोहित हळदीकर, कश्मिरा शाह, उमेश जगताप, गणेश यादव, अतुल काळे, अश्विनी कुलकर्णी, सविता मालपेकर, ईशा दिवेकर आदी कलाकारांच्या चित्रपटात भूमिका आहेत.
New Marathi Movie
कश्मिरा शाह

महेश मांजरेकरांचा चित्रपट
समाजातील वास्तववादी घटनांचे दर्शन घडवण्यात अग्रेसर असणाऱ्या निर्माता, दिग्दर्शक, अभिनेते महेश मांजरेकर पुन्हा एकदा आपल्या आगामी चित्रपटाद्वारे सत्य परिस्थिती मांडण्यासाठी सज्ज झाले आहेत. आज चहूबाजूला मांजरेकरांच्या 'नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा' या आगामी मराठी चित्रपटाची चर्चा सुरू झाली आहे. नुकतंच रिलीज करण्यात आलेलं 'नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा' या चित्रपटाचं नवं पोस्टर चित्रपटातील विविध व्यक्तिरेखांचं दर्शन घडवणारं आहे. हे पोस्टर चित्रपटातील काळ आणि वातावरणाची झलक दाखवणारं आहे. 'काँक्रिटच्या जंगलातील उद्ध्वस्त अस्तित्व' ही पोस्टरवरील टॅगलाईन दाहकतेची जाणीव करून देणारी आहे. विविध वयोगटातील चेहरे 'नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा'च्या पोस्टरवर पहायला मिळतात. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरील भाव त्यांच्या मनातील वेदना आणि विचार सांगण्यासाठी पुरेसे आहेत. या चित्रपटातील काळ जवळपास तीन दशकांपूर्वीचा आहे. त्या काळी झालेल्या गिरणी कामगारांच्या संपाचा, संपकरी आणि त्यांच्या कुटुंबाच्या जीवनावर झालेला भीषण परिणाम, त्यांची विदारक परिस्थिती, त्यांनी सहन केलेल्या वेदना, संपामुळं पूर्णत: वाताहत झालेली पिढी आणि त्याचे समाजात उमटलेले पडसाद 'नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा'मध्ये पहायला मिळणार आहेत.

New Marathi Movie
महेश मांजरेकरांचा चित्रपट

एन एच स्टुडिओजची निर्मिती
अनेक लोकप्रिय हिंदी चित्रपटांची निर्मिती तसेच वितरण करणाऱ्या 'एन एच स्टुडिओज’ या भारतातल्या अग्रगण्य निर्मिती संस्थेने ‘नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा’ या मराठी चित्रपटाच्या प्रस्तुतीची धुरा सांभाळली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने 'एन एच स्टुडिओज’ मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करीत आहेत. या चित्रपटाची निर्मिती नरेंद्र हिरावत व श्रेयांस हिरावत यांनी केली असून सहनिर्मिती ‘नाईंटीनाईन प्रोडक्शन्स’च्या विजय शिंदे यांनी केली आहे.

हेही वाचा - Devmanus 2 Serial Update : ‘देवमाणूस २’ मध्ये पुन्हा खून-सत्र सुरु?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.