ETV Bharat / sitara

...अन् नागराजने शरद जाधवच्या आईची 'ही' इच्छा केली पूर्ण

'कोण होणार मराठी करोडपती' हा केवळ एक खेळ नाही. तर, यामध्ये अनेक भावना, इच्छा, स्वप्न दडलेली आहेत. या खेळात सहभागी होणारे स्पर्धक त्यांच्या इच्छा, स्वप्नं पूर्ण करण्याच्या तयारीने येतात.

...अन् नागराजने शरद जाधवच्या आईची 'ही' इच्छा केली पूर्ण
author img

By

Published : May 30, 2019, 12:03 PM IST

मुंबई - 'उत्तर शोधलं की जगणं बदलतं', अशी दमदार टॅगलाईन असलेला 'कोण होणार मराठी करोडपती' शो नुकताच छोट्या पडद्यावर सुरू झाला आहे. शरद जाधव नावाच्या एका स्पर्धकाच्या आईचे स्वप्न या कार्यक्रमामुळे पूर्ण होणार आहे. खुद्द नागराज मंजुळे यांनी त्याच्या आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

स्वप्नांची पूर्तता करणारा खेळ, अशी ओळख असणाऱ्या या कार्यक्रमात खरंच स्वप्न पूर्ण करण्याचा किस्सा घडला आहे. शरद जाधव या स्पर्धकाने त्यांच्या आईची म्हणजेच सुवर्णा जाधव यांची एकदा तरी विमान प्रवास करण्याची इच्छा या मंचावर व्यक्त केली होती. ही इच्छा नागराज पूर्ण करतील, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले होते.

Nagraj Manjule fulfilled sharad jadhao mother wish
शरद जाधव त्याच्या आईसोबत

यावरून हेदेखील सिध्द होते की 'कोण होणार मराठी करोडपती' हा केवळ एक खेळ नाही. तर, यामध्ये अनेक भावना, इच्छा, स्वप्न दडलेली आहेत. या खेळात सहभागी होणारे स्पर्धक त्यांच्या इच्छा, स्वप्नं पूर्ण करण्याच्या तयारीने येतात. समोरील प्रश्नाचे अचूक उत्तर देऊन खेळाची एक एक पायरी जिकूंन चांगली रक्कम मिळवून आपण आपली स्वप्न सत्यात उतरवतात.

नागराज मंजुळे यांचा हा पहिला वहिला सुत्रसंचालनीय कार्यक्रम आहे. त्यामुळे नागराज हा कार्यक्रम कसा साकारतात, याची चाहत्यांना उत्सुकता होती. सर्वसामान्य व्यक्तीच्या आईसाठी नागराज यांनी घेतलेल्या पुढाकारानंतर चाहत्यांमध्ये त्यांची आणखी क्रेझ वाढली आहे.

Intro:उत्तर शोधलं की जगणं बदलतं' हे 'कोण होणार मराठी करोडपती' या कार्यक्रमातून सांगण्यात आले आहे. जगणं बदलण्यासाठी, आपलं नशीब आजमवण्यासाठी स्पर्धक या खेळात सामील झाले आहेत. आणि विशेष म्हणजे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आणि आता खऱ्या अर्थाने जगणं बदलायला सुरुवात झाली आहे.

असेच काहीस नुकतंच या कार्यक्रमात घडल. शरद जाधव या स्पर्धकाने त्यांच्या आईची म्हणजेच सुवर्णा जाधव यांची एकदा तरी विमान प्रवास करण्याची इच्छा या मंचावर व्यक्त केली आणि ही इच्छा नागराज मंजुळे पूर्ण करतील असे आश्वासन स्वतः नागराज यांनी दिले. स्पर्धकाच्या आनंदासाठी नागराज यांनी स्व खर्चाने त्यांची ही इच्छा पूर्ण केली.

ज्याप्रमाणे 'माझा मुलगाच माझी विमान प्रवासाची इच्छा पूर्ण करणार' याची खात्री जशी शरद यांच्या आईला होती तशीच उत्सुकता नागराज मंजुळे सर्वसामान्यांना कसा समजून घेणार आणि त्यांच्या आनंदात कसा सहभागी होणार याबाबत वाटत होती. पण या घटनेनंतर ही शंका आता दूर झाली आहे.

तसेच यावरुन हे देखील सिध्द होते की ‘कोण होणार मराठी करोडपती’ हा केवळ एक खेळ नसून यामध्ये अनेक भावना, इच्छा, स्वप्न दडलेली आहेत. या खेळात सहभागी होणारे स्पर्धक त्यांच्या इच्छा, स्वप्नं पूर्ण करण्याच्या तयारीने येतात. समोरील प्रश्नाचे अचूक उत्तर देऊन खेळाची एक एक पायरी जिकूंन चांगली रक्कम मिळवून आपण आपली स्वप्न सत्यात उतरवतात. ध्येय स्पर्धकाचे असते. नागराजने शरदच्या आईच हे स्वप्न नक्की कधी आणि कसं पूर्ण केलं ते मात्र आपल्याला कोण होणार करोडपतीचा पुढचा एपिसोड पाहिल्यावरच कळेल. Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.