ETV Bharat / sitara

भव्य पडद्यावर अवतरणार 'सीता', पौराणिक विश्वाचा घडणार अनोखा प्रवास

रुपेरी पडद्यावर सीता अवतार पाहायला मिलणार आहे. 'सीता-द इन्कार्नेशन' या चित्रपटाची घोषणा निर्मात्यांनी केली असून याचे लेखन बाहुबली लेखक के.व्ही.विजयेंद्र प्रसाद करणार आहेत. हा चित्रपट प्रेक्षकांना भारताच्या पौराणिक विश्वात व्हिएफएक्सच्या मदतीने अनोखा प्रवास घडवेल.

author img

By

Published : Feb 26, 2021, 2:52 PM IST

Sita - The Incarnation announced
सीता-द इन्कार्नेशन

हैदराबाद - बाहुबली लेखक के.व्ही.विजयेंद्र प्रसाद आगामी 'सीता-द इन्कार्नेशन' या बहुभाषिक चित्रपटाची लेखन करणार आहेत, अशी घोषणा निर्मात्यांनी गुरुवारी केली. ह्यूमन बीइंग स्टुडिओ प्रॉडक्शनवतीने हा चित्रपट हिंदी, तामिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होईल.

निर्मात्यांनी सोशल मीडियावरुन या चित्रपटाची घोषणा केली. यात 'सीता-द इन्कार्नेशन' चित्रपटाची कथा बाहुबली चित्रपटाचे लेखक के. व्ही. विजयेंद्र प्रसाद लिहिणार असल्याचे जाहीर केले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अलौकिक देसाई करणार आहे. मनोज मुंताशीर चित्रपटाचे संवाद आणि गीत यावर लेखन करतील. चित्रपटाबद्दलट्या अधिक तपशिलाची प्रतीक्षा आहे.

निर्मात्यांच्या मते, 'सीता-द इन्कार्नेशन' हा चित्रपट प्रेक्षकांना भारताच्या पौराणिक विश्वात व्हिएफएक्सच्या मदतीने अनोखा प्रवास घडवेल.

हेही वाचा - रेस्टॉरंटमधून बाहेर पडणाऱ्या दीपिका पदुकोणची फॅनने खेचली पर्स

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.