मुंबई - बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना नुकताच नामांकित दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या घोषणेनंतर अनेकांनी बिग बींवर शुभेच्छांचा वर्षाव केला. मुंबई पोलिसांनीही बिग बींचं खास अंदाजात अभिनंदन केलं आहे. सोशल मीडियावर मुंबई पोलिसांचं ट्विट व्हायरल झालं आहे.
अमिताभ बच्चन यांच्या 'जंजीर' चित्रपटातील एक फोटो शेअर करुन मुंबई पोलिसांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. या चित्रपटात अमिताभ यांनी 'इन्स्पेक्टर विजय' ही भूमिका साकारली होती. 'सर्वात सदाबहार, प्रेरणादायक व्यक्तिमत्व असलेल्या अमिताभ बच्चन यांना आम्ही वंदन करतो', असे ट्विट त्यांनी केलं आहे.
-
Congratulations Inspector Vijay @SrBachchan on being selected for the #DadaSahebPhalke Award. We salute you for being the most evergreen, energetic and inspirational icon to generations. pic.twitter.com/mYp1JNdi7s
— Mumbai Police (@MumbaiPolice) September 25, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Congratulations Inspector Vijay @SrBachchan on being selected for the #DadaSahebPhalke Award. We salute you for being the most evergreen, energetic and inspirational icon to generations. pic.twitter.com/mYp1JNdi7s
— Mumbai Police (@MumbaiPolice) September 25, 2019Congratulations Inspector Vijay @SrBachchan on being selected for the #DadaSahebPhalke Award. We salute you for being the most evergreen, energetic and inspirational icon to generations. pic.twitter.com/mYp1JNdi7s
— Mumbai Police (@MumbaiPolice) September 25, 2019
यंदाच्या दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी अमिताभ बच्चन यांची निवड करण्यात आली आहे. त्यांना आजवर बरेच पुरस्कार मिळाले आहेत. अग्निपथ, ब्लॅक, पा आणि पिकू यांसारख्या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आहेत. २०१५ साली त्यांनी देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार 'पद्म विभूषण' या पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.
हेही वाचा-दादासाहेब फाळके पुरस्कार: सचिन तेंडुलकरसह अनेकांचा अमिताभवर शुभेच्छांचा वर्षाव
वर्कफ्रंटबाबच सांगायचं झालं तर, काही महिन्यांपूर्वीच त्यांचा 'बदला' चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार यश मिळवलं. लवकरच ते 'ब्रम्हास्त्र' या चित्रपटातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या 'झुंड' या मराठी चित्रपटातही त्यांची भूमिका आहे. 'सैरा नरसिंह रेड्डी' या चित्रपटातही त्यांची अभिनेता चिरंजीवी यांच्यासोबत मुख्य भूमिका आहे.
सध्या ते छोट्या पडद्यावरील 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमाचं सुत्रसंचालन करत आहेत.
हेही वाचा -दादासाहेब फाळके पुरस्काराने अमिताभ यांचा होणार गौरव