मुंबई - अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि ललित प्रभाकर यांची मुख्य जोडी असलेला 'स्माईल प्लीज' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जगण्याला आणि स्वप्नांना नवी दिशा देणारा स्माईल प्लीज हा महाराष्ट्रातच नव्हे तर, सातासमुद्रापार जाण्यासाठी सज्ज झाला आहे. कारण या चित्रपटाची मेलबर्न येथे होणाऱ्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये वर्णी लागली आहे. त्यामुळे मराठी सिनेसृष्टीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे.
- View this post on Instagram
Music & Trailer launch of #smilepleasethefilm . Our cast - crew and Mr. Charming aka SRK
">
मेलबर्न फिल्म फेस्टिव्हलमध्ये उत्कृष्ट दर्जाच्या आणि वेगवेगळ्या विषयांचा समावेश असलेल्या चित्रपटांची निवड केली जाते. यामध्ये 'स्माईल प्लीज' चित्रपटाचीही वर्णी लागली आहे.
काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक सोहळा किंग खान शाहरुखच्या उपस्थितीत पार पडला. दिग्दर्शक विक्रम फडणीस यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.
या चित्रपटातील गाणी देखील सोशल मीडियावर हिट ठरत आहेत. अभिनेता प्रसाद ओक देखील या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. १९ जुलैला हा चित्रपट प्रदर्शित होईल.