ETV Bharat / sitara

...म्हणून रणवीरवर रागावली धोनीची मुलगी, धोनीने उलगडला किस्सा - Ranveer Singh news

रणवीरचा लूक पाहून धोनीची मुलगी झिवा मात्र नाराज झाली.

...म्हणून रणवीरवर रागावली धोनीची मुलगी, धोनीने उलगडला किस्सा
author img

By

Published : Oct 8, 2019, 11:48 AM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग त्याच्या अतरंगी अवतारासाठी प्रसिद्ध आहे. कोणत्याही कार्यक्रमात तो त्याच्या लूकने सर्वांचं लक्ष वेधतो. त्याचा हटके ड्रेसिंग सेन्स आणि हटके स्टाईल त्याला इतरांपेक्षा वेगळं बनवते. म्हणूनच चाहत्यांमध्येही त्याची क्रेझ पाहायला मिळते. मात्र, त्याचा लूक पाहून महेंद्रसिंग धोनीची मुलगी झिवा त्याच्यावर रागावली आहे. धोनीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून झिवाचा एक किस्सा उलगडला आहे.

रणवीरने पहिल्यांदा जेव्हा 'ऐले ब्यूटी अवार्ड्स' सोहळ्यात हजेरी लावली तेव्हा त्याच्या लूकने त्याने सर्वांना आकर्षित केलं. यावेळी रणवीर काळ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये पाहायला मिळाला. त्याने काळ्या रंगाची टोपी तसेच काळ्या रंगाचा हटके गॉगलही घातला होता. त्याच्या गॉगलप्रमाणे असलेला गॉगल झिवाकडेही असल्याचं धोनीनं म्हटलं आहे.

हेही वाचा -१४ वर्षाच्या गौरीला पाहुन किंग खानची झाली होती 'अशी' अवस्था, वाचा त्यांची प्रेमकथा

आपल्या पोस्टमध्ये धोनीनं लिहिलंय, की झिवाने जेव्हा रणवीरच्या या फोटोकडे पाहिलं, तेव्हा ती म्हणाली, की हा तर माझाच चश्मा आहे. ती वर गेली आणि तिचा चश्मा घेऊन आली. त्यानंतर तिनं म्हटलं की, 'हा फक्त माझा चश्मा आहे'. पुढे धोनीनं असं लिहिलंय, की 'आजकालची मुलं बदलली आहेत. मी तर याकडे लक्षही दिलं नव्हतं. मात्र, जेव्हाही झिवा तुला (रणवीर) भेटेल तेव्हा नक्की म्हणेल, की तुझ्या गॉगलप्रमाणेच माझ्याकडेही आहे'.

धोनीच्या या पोस्टवर नेटकरीही प्रतिक्रिया देत आहे. खुद्द रणवीरलाही ही पोस्ट आवडली आहे. त्याने यावर प्रतिक्रिया देत झिवाला फॅशनिस्टा असं म्हटलं आहे.

हेही वाचा -अवघ्या ९ वर्षाची प्रीती बनली 'सुपरस्टार सिंगर'ची विजेती

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.