ETV Bharat / sitara

सलग ११ आठवडे अधिराज्य गाजविणाऱ्या ‘झिम्मा' ने साजरी केली ‘पंच्याहत्तरी’! - झिम्मा चित्रपटाचा ११ वा आठवडा

हल्ली एखादा चित्रपट एकाच थिएटरमध्ये फार दिवस न चालणाऱ्या काळात, मराठी चित्रपट ‘झिम्मा’ ने नुकतीच चित्रपटगृहांत पंच्याहत्तरी साजरी केली. लॉकडाऊन नंतर संपूर्ण महाराष्ट्रात आणि भारतात प्रदर्शित झालेला 'झिम्मा' हा पहिलाच मोठा मराठी चित्रपट आहे. या शर्यतीत बॉलिवुडचेही अनेक सिनेमे असताना देखील ‘झिम्मा'ने आपली घोडदौड कायम ठेवली.

‘झिम्मा' ने साजरी केली ‘पंच्याहत्तरी’
‘झिम्मा' ने साजरी केली ‘पंच्याहत्तरी’
author img

By

Published : Feb 2, 2022, 9:43 AM IST

मुंबई - हल्लीच्या काळात चित्रपटाच्या यशापयशाची गणितं पहिल्या आठवड्याच्या पहिल्या तीन दिवसांत मोजली जातात. हल्ली एखादा चित्रपट एकाच थिएटरमध्ये फार दिवस न चालणाऱ्या काळात, मराठी चित्रपट ‘झिम्मा’ ने नुकतीच चित्रपटगृहांत पंच्याहत्तरी साजरी केली. लॉकडाऊन नंतर संपूर्ण महाराष्ट्रात आणि भारतात प्रदर्शित झालेला 'झिम्मा' हा पहिलाच मोठा मराठी चित्रपट आहे. या शर्यतीत बॉलिवुडचेही अनेक सिनेमे असताना देखील ‘झिम्मा'ने आपली घोडदौड कायम ठेवली. गेले अडीच महिने ९१ टक्के प्रेक्षकांची पसंती मिळवत महाराष्ट्राचा नंबर एक चित्रपट असल्याचा मान 'झिम्मा'ने पटकावला आहे.

झिम्मा प्रदर्शित झाला तेव्हा हिंदी चित्रपटही मोठ्या प्रमाणात प्रदर्शित होत होते. परंतु त्यांच्या शर्यतीतही ‘झिम्मा'ने आपला रेकॉर्ड कायम ठेवला आहे. सोशल मिडीयावरही 'झिम्मा'च्या लोकप्रियतेबद्दल अद्यापही चर्चा सुरु आहे आणि आता बघता बघता या चित्रपटाने सिनेमागृहात ७५ दिवस साजरे केले आहेत. हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘चलचित्र कंपनी' प्रस्तुत 'अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट' आणि 'क्रेझी फ्यू फिल्म्स' निर्मित 'झिम्मा' १९ नोव्हेंबर २०२१ ला प्रदर्शित झाला. एका दिवशी एकाच चित्रपटगृहात सलग अठरा खेळ हाऊसफुल्ल करण्याचा अनोखा विक्रम या चित्रपटाने केला.

प्रेक्षकांसह समीक्षकांची मने जिंकणारा हा आशयघन चित्रपट तिसऱ्या आठवड्यात आधीपेक्षा जास्त शोज मिळवून सुपरडुपर हिट ठरला. जगभरात ६० पेक्षा जास्त शहरांमध्ये प्रदर्शित झाला. झिम्माने आपल्या ५० व्या दिवशी महाराष्ट्रात ९० पेक्षा जास्त चित्रपटगृहांमध्ये राहुन आपला गौरवशाली ५० दिवस साजरा करण्याचा रेकॉर्ड बनवला. कोविड काळात पन्नास टक्के आसन क्षमता असतानाही प्रेक्षकांना सिनेमागृहात आणून १४. ५० करोडची कमाई करणारा हा ब्लॉकबस्टर चित्रपट आजही सिनेमागृहात प्रेक्षकांची मनं जिंकत आहे.

हा सिनेमा काही दिवसांपूर्वी ओटीटीवर प्रदर्शित झाला असला तरीही चित्रपटगृहात जाऊन 'झिम्मा' पाहणारा प्रेक्षकवर्गही कायम आहे. ॲमेझॉन प्राईम इंडियावर भारतातील पहिल्या पाच चित्रपटांमध्ये झळकण्याचा बहुमान पटकावला आहे. महाराष्ट्रातल्या महिलांनी या चित्रपटाला अक्षरशः डोक्यावर घेतले. अनेकींनी ‘झिम्मा' पासून प्रेरित होऊन सहलींचे आयोजनही केले आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या सहलींचे फोटोज ‘झिम्मा'च्या टीमपर्यंत पोहोचवले. प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या प्रतिसादामुळे आणि प्रेमामुळे आज झिम्माने अमृतोत्सवापर्यंत मजल मारली. इतकेच नाही तर मराठी चित्रपटांसाठी चित्रपटगृहांची दारेही पुन्हा उघडली. सलग ११ आठवडे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा हा चित्रपट आता केवळ चित्रपट राहिला नसून तो आता एक सोहळा झाला आहे.

'झिम्मा' चित्रपटात सिद्धार्थ चांदेकर, निर्मिती सावंत, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सोनाली कुलकर्णी, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर चित्रपटाच्या लेखनाची धुरा इरावती कर्णिक यांनी सांभाळली असून संगीत अमितराज यांनी केले आहे. क्षिती जोग यांच्यासोबत स्वाती खोपकर, अजिंक्य ढमाळ, विराज गवस, उर्फी काझमी, सनी शाह यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

'झिम्मा' च्या यशाबद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणाला, “मागील दोन वर्षांत अनेक वेळा प्रदर्शनाच्या तारखा बदलाव्या लागल्या होत्या, अनेक अडचणी आल्या तरीही बऱ्याच प्रतिक्षेनंतर झिम्मा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. त्याला प्रेक्षकांकडून मिळत असलेले प्रेम पाहून माझ्या मनात आज अनेक भावना आहेत. 'झिम्मा' प्रेक्षकांसाठी जशी रोलरकोस्टर राईड होती, तशी अनेक कारणांमुळे ती माझ्यासाठीही होती. पहिल्या दिवसापासून पंचाहत्तर दिवसांचा हा यशस्वी प्रवास तमाम प्रेक्षकांमुळेच शक्य झाला असे मी म्हणेन. रसिक प्रेक्षकांचे मनापासून आभार.”

हेही वाचा - अमिताभ बच्चन झाले आजोबा... नयना बच्चनला झाला मुलगा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.