ETV Bharat / sitara

‘हरीओम'मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या तत्त्वांवर चालणारे आधुनिक मावळे! - film was produced by Hariom Ghadge

'हरीओम' या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाले होते. पोस्टरमधील पिळदार शरीरयष्टी असणाऱ्या दोन तरुणांबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. अखेर या कलाकारांच्या चेहऱ्यावरील पडदा आता उठला असून या दोन्ही कलाकारांची नावे आता समोर आली आहेत. हरीओम घाडगे आणि गौरव कदम हे या चित्रपटातील प्रमुख कलाकार आहेत.

Hari Om
‘हरीओम'
author img

By

Published : Feb 20, 2021, 3:06 PM IST

अलीकडच्या काळात चित्रपट निर्माणाधीन असताना त्याबद्दल बरीच गुप्तता पाळली जाते. एक दोन जुजबी गोष्टी सोडून एकंदरीत चित्रपटाबद्दलची माहिती गुलदस्त्यात ठेवली जाते. चित्रपट प्रदर्शनाजवळ आला की हळूहळू एक त्यातील एक गोष्ट बाहेर आणली जाते जेणेकरून प्रेक्षकांची उत्सुकता ताणली जावी. काही दिवसांपूर्वी श्रीहरी स्टुडिओ प्रस्तुत 'हरीओम' या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाले होते. पोस्टरमधील पिळदार शरीरयष्टी असणाऱ्या दोन तरुणांबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. अखेर या कलाकारांच्या चेहऱ्यावरील पडदा आता उठला असून या दोन्ही कलाकारांची नावे आता समोर आली आहेत. हरीओम घाडगे आणि गौरव कदम हे या चित्रपटातील प्रमुख कलाकार आहेत.

Hari Om
'हरीओम' या चित्रपटाचे पहिले पोस्टर
हरिओम घाडगे यांनीच या चित्रपटाची निर्मिती केली असून या सिनेमात तो मोठ्या भावाची म्हणजेच हरीची भूमिका साकारणार आहेत तर ओमची भूमिका गौरव कदम साकारणार आहे. गौरवचा हा पहिलाच सिनेमा असला तरी ती चित्रपटसृष्टीशी जोडलेला होता. त्याने अनेक हिंदी, मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांना फिटनेस ट्रेनिंग दिले आहे. या चित्रपटात दोघे भावंडांची भूमिका साकारत असल्याने, त्यांच्यातील केमेस्ट्री खरी वाटावी, यासाठी शूटिंगच्या आधी काही महिने ते एकत्र राहिले. या दरम्यान त्यांनी तलवारबाजी, लाठीकाठी, दांडपट्टा यांसारख्या शिवकालीन मैदानी खेळाचे प्रशिक्षण घेतले. तसेच त्यांच्या डाएटवर, व्यायामावरही लक्ष केंद्रित केले. इतकेच नाही तर दोघांनी एकत्र स्वयंपाकही केला. हरिओम आणि गौरव यांचा हा पहिलाच सिनेमा असल्याने त्यांनी या सिनेमासाठी खूप मेहनत घेतली आहे. बराच काळ एकत्र व्यतीत केल्यामुळे त्यांच्यात भावनिक नाते तयार झाले आणि या नात्याचेच प्रतिबिंब प्रेक्षकांना पडद्यावर पाहायला मिळणार आहे. हरीओम घाडगे आणि गौरव कदम या दोघांच्या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीला दोन उमदे कलाकार मिळणार आहेत. ॲक्शन, ड्रामा, रोमान्स, रहस्यावर आधारित हा सिनेमा एंटरटेनमेंट पॅकेजचा धमाका यात असणार आहेया चित्रपटाचे निर्माता आणि अभिनेता हरिओम घाडगे त्यांच्या एकंदर अनुभवाबद्दल सांगतात, "मी या क्षेत्रात पूर्णपणे नवखा आहे. मुळात मी एक व्यावसायिक आहे. स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी आणि व्यायामाची प्रचंड आवड असल्याने मी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या तत्त्वांवर चालणारे नवीन युगाचे मावळे 'हरीओम'मध्ये दाखवण्यात आले आहेत.” या सिनेमातील 'ओम' ही भूमिका साकारणारे गौरव कदम आपल्या भूमिकेविषयी म्हणाले, "जवळपास वर्षभर मी आणि हरिदादाने फिटनेसकडे लक्ष दिले. फिटनेस संदर्भातील अनेक गोष्टी मला आधीपासूनच माहित आहेत. कराटे, कमांडो ट्रेनिंग, किक बॉक्सिंग, जिमनॅस्टिक यांसारख्या अनेक प्रकारांमध्ये मी प्रशिक्षित असल्याने ही भूमिका साकारताना आम्हाला त्याचा खूप फायदा झाला.'' आशिष नेवाळकर दिग्दर्शित ‘हरिओम’ हा चित्रपट साधारण मेपर्यंत प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

हेही वाचा - सरसेनापती हंबीररावमध्ये 'हा' अभिनेता साकारणार छत्रपती शिवाजी महाराज!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.