माईक टायसननने विजय देवरकोंडा, अनन्या पांडेसोबत घेतला भारतीय जेवणाचा आनंद - Mike Tyson enjoyed an Indian meal
टॉलिवूड अभिनेता विजय देवरकोंडा (Tollywood Actor Vijay Devarakonda) आणि बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे (Bollywood Actress Ananya Pandey) त्यांच्या आगामी 'लाइगर' ('Liger' Movie) चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. बॉक्सिंग लिजेंड माइक (Boxing Legend Mike Tyson)टायसनही या चित्रपटात दिसणार आहे.
हैदराबाद: टॉलिवूड अभिनेता विजय देवरकोंडा (Tollywood Actor Vijay Devarakonda) आणि बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे (Bollywood Actress Ananya Pandey) त्यांच्या आगामी 'लाइगर' ('Liger' Movie) चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. बॉक्सिंग लिजेंड माइक (Boxing Legend Mike Tyson)टायसनही या चित्रपटात दिसणार आहे.
लोकप्रिय चित्रपट निर्माते पुरी जगन्नाथ (Puri Jagannath) यांच्या दिग्दर्शनाखाली, 'लाइगर' ची टीम सध्या माइक टायसनसोबत लास वेगासमध्ये चित्रपटासाठी शूटिंग करत आहे.
ताज्या अहवालानुसार, 'लाइगर' टीमने माइक टायसन आणि त्याची पत्नी किकी यांच्यासाठी लंचमध्ये भारतीय जेवणाचे आयोजन केले होते, कारण माइक आणि त्याची पत्नी यांना भारतीय जेवण खूप आवडते. टीमने सांगितले की, माजी बॉक्सिंग चॅम्पियन टायसनने लंचसाठी गार्लिक नान, तंदूरी चिकन, बटर चिकन, फिश टिक्का मसाला आणि मटन बिर्याणी, समोसा, आलू गोबी, पालक पनीर आणि कबाबचा आस्वाद घेतला.
टायसनसोबत दुपारच्या जेवणानंतर, सर्वांनी आनंदी पोझ दिली. माईक टायसनही 'लायगर' टीमचे प्रेम आणि आदरातिथ्य पाहून खूप खूश झाला आहे.
विजय देवरकोंडा 'लाइगर' मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. त्याचबरोबर या चित्रपटाद्वारे अनन्या पांडे तेलगू चित्रपटांमध्ये पदार्पण करत आहे, तसेच हा पहिला भारतीय चित्रपट आहे ज्यामध्ये माइक टायसन कॅमिओमध्ये दिसणार आहे. विजय देवरकोंडा 'लाइगर' मध्ये बॉक्सरच्या भूमिकेत दिसणार आहे. .पुरी जगन्नाध, चार्मे कौर, करण जोहर आणि अपूर्व मेहता यांनी संयुक्तपणे या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
हेही वाचा - कोरोना लस घेण्याबद्दल सलमान खानचे जनतेला आवाहन