ETV Bharat / sitara

रागाने लालबुंद झालेला मिका आणि लुटूपटूच्या बहिष्काराची गोष्ट - mika singh

एकीकडे देशासाठी जवान प्राणाची आहुती देऊन प्राणपणाने देशासाठी लढतात. तर दुसरीकडे मिकासारखे कलाकार राजरोसपणे त्यांना गोळ्या घालणाऱ्यांच्या देशात जाऊन परफॉर्म करतात. कारण, त्यांना माहीत असतं, भारतात परतल्यावर एक माफी आणि एवढ नाटक त्याची चूक दुरुस्त करायला पुरेसं आहे.

रागाने लालबुंद झालेला मिका आणि लुटूपटूच्या बहिष्काराची गोष्ट
author img

By

Published : Aug 22, 2019, 8:12 AM IST

मुंबई - गायक असलेल्या मिका सिंगने उदार अंतकरणाने आणि फेडरेशनच्या सदस्यांच्या भावनांचा मान ठेवून संपूर्ण देशाची माफी मागत असल्याचं जाहीर केलं. त्याच्या माफीनंतर लगेच त्याच्यावर टाकण्यात आलेला बहिष्कारही तात्काळ मागे घेण्यात आला. त्यामुळे काही दिवस बहिष्काराचा सामना करणाऱ्या मिकाने सुटकेचा निश्वास टाकला. मीडियाला समोर जात फेडरेशनचे अध्यक्ष बी. एन. तिवारी, अशोक पंडित आणि स्वतः मिकाने आपली बाजू मांडली. त्यानंतर सारं काही आलबेल झालं. मात्र, मुद्याचे बोलून झाल्यावर मीडियाने मिकाला अवघड प्रश्न विचारायला सुरुवात केली तेव्हा मात्र, मिकाचं वेगळंच रूप पाहायला मिळालं.

मिका पाकिस्तानमधील गुरुद्वाराला भेट देण्यासाठी ३ ऑगस्टला पाकिस्तानला गेला तर जम्मू आणि काश्मीर मध्ये ३७० कलम हटवण्याचा निर्णय ५ ऑगस्टला झाला. तरीही तू ८ ऑगस्टचा हा कार्यक्रम का केलास..? कार्यक्रम रद्द करणे सहज शक्य असून तू तसं का केलं नाहीस..? यावर मिकाने कार्यक्रम फार आधीच स्वीकारल्याने करावा लागल्याचं सांगितलं. त्यावर पत्रकारांनी त्याला तो २८ ऑगस्टला अमेरिकेत करणार असलेल्या कॉन्सर्टची आठवण करून दिली. या कॉन्सर्टचा आयोजक पाकिस्तानी आहे.

आता हा प्रश्न ऐकताच मिका पाजीचा पारा चढला. त्याने ४ महिन्यांपूर्वी सोनू निगम आणि अतिफ अस्लम याचा इव्हेंट झाल्याचं सांगितलं. पाठोपाठ नेहा कक्कर आणि अतिफ याचा कॉन्सर्ट झाल्याची आठवण करून दिली. त्यासोबत राहत आणि अतिफची गाणी राजरोसपणे एफएमवर चालत असतात हे देखील सांगितलं. त्यांना तर कुणीच जाब विचारत नाही. मग मीच टार्गेट का..? असा प्रतिप्रश्न मीडियालाच विचारला. म्हणजे, पाजी माफी मागत असले तरीही त्यांनी ते काही चुकीचं वागले आहेत, असं काही वाटतच नव्हतं.

रागाने लालबुंद झालेला मिका आणि लुटूपटूच्या बहिष्काराची गोष्ट

दरम्यान एरव्ही मिकाची बाजू न ऐकता थेट बहिष्कार घालणाऱ्या फेडरेशनवर मिकाने अशी काय मोहिनी घातली की अवघ्या एका तासात फेडरेशन मधील ३६ उपसंघटनाच्या पदाधिकाऱ्यांचा हा बहिष्कार मागे घेण्याबाबत एकमत झालं ते कोड काही शेवटपर्यंत उलगडलं नाही. म्हणजे एकीकडे बहिष्कार टाकायचा, आणि फक्त यावेळी चुकलो, पुन्हा असं करणार नाही, असं म्हटल्यावर लगेच माफही करायचं. अजून नक्की किती जणांना फेडरेशन असं माफ करणार ते त्यांचं त्यांनाच ठाऊक.

फेडरेशनच्या कार्यालयात माफी नाट्य सुरू असताना कार्यालयाच्या बाहेर मात्र, मिकाचे चक्क समर्थक सुद्धा जमले होते. ज्याच्या हातात 'वी लव मिका पाजी' असले बोर्ड झळकत होते. यातील काही जणांना मिका सिंग नक्की कोण आहेत..? असं विचारलं, तर त्याने ते पुढे उभे आहेत, त्यांना विचारा असं उत्तर 'ई टीव्ही' भारतच्या पत्रकाराला दिलं. थोडक्यात काय, तर हा सगळा ड्रमा मिकाला सहानुभूती मिळवून देण्यासाठी घडवून आणण्यात आला होता. मिकाची माफीदेखील मान्य झाल्याने आता मीडियाला काहीच करता येणं शक्य नव्हतं.

एकीकडे देशासाठी जवान प्राणाची आहुती देऊन प्राणपणाने देशासाठी लढतात. तर दुसरीकडे मिकासारखे कलाकार राजरोसपणे त्यांना गोळ्या घालणाऱ्यांच्या देशात जाऊन परफॉर्म करतात. कारण, त्यांना माहीत असतं, भारतात परतल्यावर एक माफी आणि एवढ नाटक त्याची चूक दुरुस्त करायला पुरेसं आहे. त्याचं सांगीतिक करिअर महत्वाचं. इतरांचा जीव गेला तरी आम्हाला त्याचं काय, ही बेगडी देशभक्ती काय कामाची.??
मिकावरील लुटूपटूच्या बहिष्काराने सुरू झालेलं नाटक त्याच्या माफीने संपलं. मिकाने या पाकिस्तान मधील परफॉर्मन्ससाठी दीड लाख डॉलर्स म्हणजे १ कोटी रुपये घेतले होते. जसा आला तसा मिका निघूनही गेला. त्याचे फलक घेऊन उभे असलेले समर्थकही पांगले. जाता जाता त्याच्या बागलबच्च्यांनी जमलेल्या टोळक्याचाही हिशोब केला. गेटच्या बाहेरच त्यांचे पैसे वाटत वाटत पुढे जाणारे म्होरके दिसले. आणि मनात विचार आला, 'भारत माता की जय'...!

Intro:( जमल्यास या बातमीत मिका चिडून उत्तरं देत असल्याचा बाईट सगळ्यात शेवटी आहे तो वापरावा..बाकीचे टाळले तरी चालतील.)

मिका सिंगने उदार अंतकरणाने आणि फेडरेशनच्या सदस्यांच्या भावनांचा मान ठेवून संपूर्ण देशाची माफी मागत असल्याचं जाहीर केलं, आणि त्याच्यावर टाकण्यात आलेला बहिष्कार तत्काळ मागे घेण्यात आला. त्यामुळे गेले काही दिवस बहिष्काराचा सामना करणाऱ्या मिकाने सुटकेचा निश्वास टाकला. मीडियाला समोर जात फेडरेशनचे अध्यक्ष बी एन तिवारी, अशोक पंडित आणि स्वतः मिकाने आपली बाजू मांडली आणि सारं काही आलबेल झालं.

मात्र मुद्द्याचे बोलून झाल्यावर मीडियाने मिकाला अवघड प्रश्न विचारायला सुरुवात केली. मिका पाकिस्तान मधील गुरुद्वाराला भेट देण्यासाठी 3 ऑगस्ट रोजी पाकिस्तानला गेला तर जम्मू आणि काश्मीर मध्ये 370 कलम हटवण्याचा निर्णय 5 ऑगस्ट रोजी झाला तरीही तू 8 ऑगस्टचा हा कार्यक्रम का केलास..? कार्यक्रम रद्द करणे सहज शक्य असून तू तस का केलं नाहीस..? यावर मिकाने कार्यक्रम फार आधीच स्वीकारल्याने करावा लागल्याचं सांगितलं. त्यावर पत्रकारांनी त्याला तो 28 ऑगस्ट रोजी अमेरिकेत करणार असलेल्या कॉन्सर्टची आठवण करून दिली. या कॉन्सर्टचा आयोजक पाकिस्तानी आहे, आणि हा प्रश्न ऐकताच मिका पाजीचा पारा चढला, त्याने 4 महिन्यांपूर्वी सोनू निगम आणि अतिफ अस्लम याचा इव्हेंट झाल्याचं सांगितलं, पाठोपाठ नेहा कक्कर आणि अतिक याचा कॉन्सर्ट झाल्याची आठवण करून दिली. त्यासोबत राहत आणि अतिफची गाणी राजरोसपणे एफएमवर चालत असतात हे देखील सांगितलं, त्यांना तर कुणीच जाब विचारत नाही, मग मीच टार्गेट का..? असा प्रतिप्रश्न मीडियालाच विचारला. म्हणजेच पाजी माफी मागत असले तरीही त्यांनी ते काही चुकीचं वागले आहेत असं काही वाटतच नव्हतं.

दरम्यान एरव्ही मिकाची बाजू न ऐकता थेट बहिष्कार घालणाऱ्या फेडरेशनवर मिकाने अशी काय मोहिनी घातली की अवघ्या एका तासात फेडरेशन मधील 36 उपसंघटनाच्या पदाधिकार्याच हा बहिष्कार मागे घेण्याबाबत एकमत झालं ते कोड काही शेवटपर्यंत उलगडलं नाही..म्हणजे एकीकडे बहिष्कार टाकायचा, आणि फक्त यावेळी चुकलो पुन्हा अस करणार नाही अस म्हटल्यावर लगेच माफ़ही करायचं, अजून नक्की किती जणांना फेडरेशन अस माफ करणार ते त्यांचं त्यांनाच ठाऊक..

फेडरेशनच्या कार्यालयात माफी नाट्य सुरू असताना कार्यालयाच्या बाहेर मात्र मिकाचे चक्क समर्थक सुद्धा जमले होते. ज्याच्या हातात 'व्ही लव मिका पाजी' असले बॉर्ड झळकत होते. यातील काही जणांना मिका सिंग नक्की कोण आहेत..? असं विचारलं, तर त्याने ते पुढे उभे आहेत त्यांना विचारा अस उत्तर ई टीव्ही भारतच्या पत्रकाराला दिलं, दुसऱ्या मावशी तर मिका पाकिस्तान मध्ये गेला मग चुकलं काय..?? सरकारने त्याला तिथे जाऊच कस दिल.?? अस म्हणत दुसऱ्या एका चॅनलच्या महिला पत्रकाराला निरुत्तर केलं. थोडक्यात काय, तर हा सगळा ड्रमा मिकाला सहानुभूती मिळवून देण्यासाठी घडवून आणण्यात आला होता. आणि मिकाची माफी मान्य झाल्याने आता मिडियाला काहीच करता येणं शक्य नव्हतं.

एकीकडे देशासाठी जवान प्राणाची आहुती देऊन प्राणपणाने देशासाठी लढतात.तर दुसरीकडे मिकासारखे कलाकार राजरोसपणे त्यांना गोळ्या घालणाऱ्यांच्या देशात जाऊन परफॉर्म करतात. कारण त्यांना माहीत असतं, भारतात परतल्यावर एक माफी आणि एवढ नाटक त्याची चूक दुरुस्त करायला पुरेसं आहे. त्याचं सांगीतिक करिअर महत्वाचं, इतरांचा जीव गेला तर जाईना..ही बेगडी देशभक्ती काय कामाची.??

मिकावरील लुटूपटूच्या बहिष्काराने सुरू झालेल नाटक त्याच्या माफीने संपलं..मिकाने या पाकिस्तान मधील परफॉर्मन्ससाठी दीड लाख डॉलर्स म्हणजे 1 कोटी रुपये घेतले होते...जसा आला तसा मिका निघूनही गेला..त्याचे फलक घेऊन उभे असलेले समर्थकही पांगले..जाता जाता त्याच्या बागलबच्च्यांनी जमलेल्या टोळक्याचाही हिशोब केला..गेटच्या बाहेरच त्यांचे पैसे वाटत वाटत पुढे जाणारे म्होरके दिसले...आणि मनात विचार आला, 'भारत माता की जय'..

Body:.

Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.