ETV Bharat / sitara

अशोक सराफ व लक्ष्मीकांत बेर्डे अभिनित 'शेजारी शेजारी' चित्रपटाला ३० वर्षे पूर्ण! - अशोक सराफ लक्ष्मीकांत बेर्डे न्यूज

अमोल प्राॅडक्शन्सच्या 'शेजारी शेजारी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनास २५ जानेवारी २०२१ रोजी यशस्वी तीस वर्षे पूर्ण होत आहेत. दिलीप कोल्हटकर दिग्दर्शित या चित्रपटाचे निर्माते सचिन पारेकर आणि संजय पारेकर हे आहेत. खुसखुशीत मांडणी, सकस अभिनय, उत्तम निर्मिती मूल्ये ही या चित्रपटाची खास वैशिष्ट्य आहेत. महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवात या चित्रपटासाठी उत्कृष्ट ध्वनिमुद्रक म्हणून प्रदीप देशपांडे यांना पुरस्कार प्राप्त झाला. ‘शेजारी शेजारी’ ला ३०व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.

'शेजारी शेजारी' या चित्रपटाला ३० वर्षे पूर्ण

author img

By

Published : Jan 24, 2021, 5:59 PM IST

मुंबई - जुन्या आठवणींत रमणे हा मनुष्याचा स्वभावधर्म आहे आणि चित्रपटवाले काही अपवाद नाहीत. सध्या मनोरंजनसृष्टीत ‘नॉस्टॅलजिया’ फॅशनमध्ये आहे. 'जुने ते सोने' म्हणत जुन्या चित्रपटांच्या ‘ॲनिव्हर्सरीज’ साजऱ्या केल्या जात आहेत. हिंदी चित्रपटवाल्यांसारखीच मराठी चित्रपटांचीसुद्धा आठवण काढली जातेय. अमोल प्राॅडक्शन्सच्या (कल्याण) 'शेजारी शेजारी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनास २५ जानेवारी २०२१ रोजी यशस्वी तीस वर्षे पूर्ण होत आहेत. दिलीप कोल्हटकर दिग्दर्शित या चित्रपटाचे निर्माते सचिन पारेकर आणि संजय पारेकर हे आहेत. मुंबईत या चित्रपटाचे मेन थिएटर प्लाझा होते. या चित्रपटाची पटकथा अशोक पाटोळे यांची असून संवादही त्यांनीच लिहिले आहेत. समज-गैरसमज यातून घडत गेलेल्या प्रासंगिक विनोदांची धमाल फोडणी म्हणजे हा चित्रपट होय.

'शेजारी शेजारी' या चित्रपटाला ३० वर्षे पूर्ण
'शेजारी शेजारी' या चित्रपटाला ३० वर्षे पूर्ण
हेही वाचा - ‘बॅरिस्टर बाबू’ च्या सेटवरील जिवाभावाच्या मैत्रिणी, चाहत तेवानी आणि औरा भटनागर

प्रीति हिचा फोटोग्राफर नवरा राजेश याच्यावर एका ‘कस्टमर’ शी प्रेमसंबंध असल्याचा संशय आहे आणि त्यामुळे चिडून तिने घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. ती तिची मैत्रिणी सुशीला आणि तिचा नवरा केशव यांच्या बंगल्याच्या समोर स्वतंत्रपणे राहू लागली आहे. प्रीतीला असे कळते आहे की, आजोबांनी तिच्यासाठी २५ लाख रुपये ठेवले आहेत. ते तिला तेव्हाच मिळू शकतात, जेव्हा तिचे कौटुंबिक जीवन आनंदमयी सुरू असेल. अन्यथा, ते पैसे तिच्या चुलत भावाला मिळतील. केशव तिच्या घरी येतो, तेव्हा तोच तिचा नवरा आहे, असा आजोबांचा गैरसमज होतो. तरीही ते गुप्तहेराची नेमणूक करतात, संपूर्ण सत्य पडताळून बघण्यासाठी. केशवचा ऑफिस स्टाफही केशव-प्रीतीचे फोटो शहरभर लावतात, ते नवरा-बायको आहेत असं समजून. इथे राजेश घरी परत येतो. परंतु, हा प्रकार बघून सुशीलाकडे राहायला जातो. पुढे अजूनही प्रासंगिक विनोदांची लडी लागत विनोदाचे फटाके फुटतच राहतात.

या चित्रपटात अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, वर्षा उसगावकर आणि निशिगंधा वाड या चौघांभोवती कथानक फिरत राहते. तसेच श्रीकांत मोघे, संजय मोने, नयना आपटे, किशोर नांदलस्कर, किशोर प्रधान, अरविंद सरफरे, रवीन्द्र बेर्डे, राम कोल्हटकर, रवि पटवर्धन, मुकुंद बिवाडकर, माया गुर्जर, विनय सावंत आणि जयंत सावरकर यांच्याही या चित्रपटात भूमिका आहेत. गीते प्रवीण दवणे यांची असून संगीत विश्वास पाटणकर यांचे आहे. यात एक मुलगा तुझ्यासारखा स्वप्नी पाहिला, शंभर नंबरी शुध्द सज्जन, आला आला मोका मीठीचा दे मोका, प्रश्न-उत्तर असते नेहमी शेजारी-शेजारी या गाण्यांचा समावेश आहे. ही गाणी अनुराधा पौडवाल, सुरेश वाडकर, अनिरुद्ध जोशी आणि प्रज्ञा खांडेकर यांनी गायली आहेत. या चित्रपटाचे छायाचित्रण देबू देवधर, संकलन अशोक पटवर्धन, कला गुरुजी बंधू यांची आहे.

खुसखुशीत मांडणी, सकस अभिनय, उत्तम निर्मिती मूल्ये ही या चित्रपटाची खास वैशिष्ट्य आहेत. महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवात या चित्रपटासाठी उत्कृष्ट ध्वनिमुद्रक म्हणून प्रदीप देशपांडे यांना पुरस्कार प्राप्त झाला. ‘शेजारी शेजारी’ ला ३०व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.

हेही वाचा - ‘मोलक्की’ ची प्रियल महाजन वापरते फक्त, सेंद्रिय सौंदर्य प्रसाधने!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.