ETV Bharat / sitara

नव्या वर्षात एक हटके प्रेमकथा 'मजनू' येणार प्रेक्षकांच्या भेटीला - Majnu directed by Shivaji Dolatade

दिग्दर्शक शिवाजी दोलताडे यांच्या 'मजनू' चित्रपटात नितीश चव्हाण, रोहन पाटील, स्वेतलाना अहिरे प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. 'मजनू' हा चित्रपट नवीन वर्षाच्या सुरुवातीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

मराठी प्रेमकथा मजनू
मराठी प्रेमकथा मजनू
author img

By

Published : Dec 21, 2021, 8:09 PM IST

मराठी चित्रपट आणि प्रेमकथा यांचे एक वेगळे समीकरण आहे. नव्या वर्षात एक हटके प्रेमकथा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून ' मजनू' असे या चित्रपटाचे नाव आहे. सोनाई फिल्म क्रिएशन निर्मित 'मजनू' चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. लवकरच हा 'मजनू' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अलिकडेच या चित्रपटाचा पोस्टर आणि मोशन पोस्टर लाँच सोहळा मुंबईत पार पडला.

शिवाजी दोलताडे दिग्दर्शित 'मजनू' या चित्रपटात 'लागीर झालं जी' फेम अभिनेता नितीश चव्हाण, अभिनेता रोहन पाटील आणि अभिनेत्री स्वेतलाना अहिरे प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

'मजनू' चित्रपटाच्या पोस्टरमध्ये नितीश चव्हाण हा रुबाबदारपणे घोड्यांच्या मध्ये धावत आहे. तर रोहन पाटील आणि स्वेतलाना अहिरे हे एकमेकांसोबत दिसत आहेत. अतिशय लक्षवेधी असलेल्या पोस्टरमुळे या चित्रपटाबद्दल उत्सुकता ताणली गेली आहे.

'मजनू' बद्दल बोलताना दिग्दर्शक शिवाजी दोलताडे म्हणाले की, 'मजनू' हे एक ग्रामीण बाज असलेल्या निमशहरी भागातील कथानक आहे. हळुवारपणे फूलणाऱ्या प्रेमकथे सोबतच प्रेक्षकांना उत्कंठावर्धक सस्पेन्स बघायला मिळणार आहे. 'मजनू'ची कथा, पटकथा आणि संवाद गोवर्धन दोलताडे यांचे असून चित्रपटात नितीश चव्हाण, रोहन पाटील, स्वेतलाना अहिरे, सुरेश विश्वकर्मा, मिलिंद शिंदे, अरबाज शेख, प्रणव रावराणे, आदिती सारंगधर, माधवी जुवेकर, भक्ती चव्हाण यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत.

'मजनू' ला संगीतकार पी. शंकरम, सचिन अवघडे, साजन - विशाल यांचे संगीत लाभले आहे तर चित्रपटातील गीतांना इंडियन आयडॉल फेम सलमान अली, आदर्श शिंदे, संदीप उबाळे, बेला शेंडे, आनंदी जोशी व विशाल चव्हाण यांचा स्वरसाज लाभला आहे. संकलन चेतन सागडे यांचे, कला दिग्दर्शन महेश कोरे, डिओपी एम. बी.अळ्ळीकट्टी तर कोरिओग्राफर हाईट मंजू आहेत. 'मजनू' हा चित्रपट लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा - अभिजीत बिचुकलेवर भडकला सलमान, देवोलिनाकडे चुंबन मागणे पडलं महागात

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.