ETV Bharat / sitara

तोरणा, राजगड किल्ल्यावरुन हेलिकॉप्टरने केलं ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटाचं पोस्टर लॉन्च

सुपरहिट ठरलेल्या ‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा पुढील चित्रपट ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचा पोस्टर लॉन्च सोहळा पार पडला. तोरणा आणि स्वराज्याची पहिली राजधानी असलेल्या राजगड या किल्यावरुन हेलीकॉप्टरने चित्रपटाचे पोस्टर आकाशात लाँच करण्यात आले. शिवराज्याभिषेक दिना निमित्त हेलिकॉप्टरमधून गड किल्यांचे दर्शन घेत वाहिली शिव छत्रपतींना मानवंदना.

‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटाचे पोस्टर लॉन्च
author img

By

Published : Jun 6, 2019, 8:14 PM IST

हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पराक्रमाची आणि जाज्वल्य इतिहासाची महती सांगणाऱ्या उर्विता प्रोडक्शन्स निर्मित ‘सरसेनापती हंबीरराव’ या भव्यदिव्य मराठी चित्रपटाची घोषणा आणि पहिल्या पोस्टरचा अनावरण सोहळा कोंढणपूर, पुणे येथे पार पडला. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ ज्या किल्ल्यावर रोवली अशा तोरणा आणि स्वराज्याची पहिली राजधानी असलेल्या राजगड या किल्ल्यावरुन हेलीकॉप्टरने या चित्रपटाचे पोस्टर आकाशात लाँच करण्यात आले.

Hambirrao, poster launch
‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटाचे पोस्टर लॉन्च

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या स्वराज्याच्या दोन्ही छत्रपतींचे सरसेनापती होण्याचा बहुमान हंबीरराव मोहिते यांनी मिळवला. शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या या सोहळ्याला, चित्रपटाचे लेखक/दिग्दर्शक प्रविण विठ्ठल तरडे, निर्माते संदीप रघुनाथराव मोहिते पाटील, धर्मेंद्र सुभाष बोरा व सौजन्य सुर्यकांत निकम तसेच मराठा महासंघाचे राजेंद्र कोंढरे, धैर्यशील मोहिते पाटील, तळबीड गावचे सरपंच जयवंत नाना मोहिते पाटील, एस. पी. मिलिंद मोहिते पाटील, एडव्होकेट सुभाष मोहिते, एडव्होकेट प्रशांत मोहिते, सुरेश मोहिते, शिरीष मोहिते, गणेश मोहिते, अरविंद मोहिते, रोहित मोहिते, प्रतिक मोहिते, विक्रांत मोहिते, उद्योजक आणि निर्माते अभिजित भोसले, उद्योजक शेखर जावळकर, अमित गायकवाड, माधव सुर्वे, सुनील पालकर, विनोद वणवे, विशाल चांदणे, महेश हगवणे, अमोल धावडे, सुर्यकांतजी निकम, सुभाषजी बोरा, सुरज भिसे, तुषारजी भामरे, रणजीत ढगे पाटील, अभयसिंग अडसूळ, अभिनेते रमेश परदेशी, सुनील अभ्यंकर,किरण यज्ञोपवित, देवेंन्द् गायकवाड, संगीतकार नरेंद्र भिडे, गीतकार प्रणीत कुलकर्णी, शिवव्याख्याते सौरभ महेश कर्डे, कला दिग्दर्शक एकनाथ कदम, मार्केटिंग सल्लागार विनोद सातव इ. मान्यवर उपस्थित होते.

शिवाजी महाराजांवर असलेले प्रेम म्हणून-

कुठल्याही स्टुडीओचे पाठबळ नसताना, केवळ समाजभान जपणाऱ्या विषयाच्या बळावर प्रविण तरडे यांच्या ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाने घवघवीत यश मिळवले. ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटातून प्रविण तरडे आता ऐतहासिक विषयाला हात घालण्यासाठी सज्ज झाले आहेत. चित्रपटाचे निर्माते संदीप रघुनाथराव मोहिते पाटील आपल्या व्यवसायाबरोबरच ‘शिवनेरी फाउंडेशन’ आणि ‘सरनौबत हंबीरराव प्रतिष्ठान’ या समाजसेवी संस्थांच्या अंतर्गत ते विविध सामाजिक कार्य आणि उपक्रम राबवत असतात. तसेच, निर्माते सौजन्य सुर्यकांत निकम हे उद्योजक आणि पुण्यातील प्रसिद्ध विजय टॉकीजचे मालक असून शिवाजी महाराजांवर असलेले प्रेम म्हणून ते हेलिकॉप्टर मधून गडकिल्ल्यांची सफर हा उपक्रम राबवतात. तसेच निर्माते धर्मेंद्र सुभाष बोरा हे ऑटोमोबाईल क्षेत्रात व्यवसाय करत असून ‘मुळशी पॅटर्न’च्या निमित्ताने प्रविण तरडे यांच्या कामाच्या पद्धतीवर प्रभावित होऊन त्यांच्याबरोबर काम करायचं, या उद्देशांनी ते या चित्रपटाच्या निर्मितीत सहभागी झाले आहेत.

‘सरसेनापती हंबीरराव’ या भव्य मराठी चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, सरसेनापती हंबीरराव मोहिते व इतर महत्वाच्या भूमिका पडद्यावर कोण साकारणार याबद्दल औत्सुक्य निर्माण झाले आहे, तसेच लवकरच चित्रपटाच्या शुटींगला सुरुवात होणार असल्याचे आणि २०२० सालच्या सुरुवातीला हा चित्रपट प्रेक्षकांसमोर येईल, असे चित्रपटाचे लेखक/दिग्दर्शक प्रविण विठ्ठल तरडे यांनी सांगितले.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.