ETV Bharat / sitara

'बिग बॉस'च्या घरातील पहिलं एलिमीनेशन, मैथिली जावकर घरातून बाहेर

या आठवड्यामध्ये पराग कान्हेरे, अभिजीत केळकर, विणा जगताप, मैथिली जावकर, माधव देवचके आणि नेहा शितोळे हे घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेमध्ये नॉमिनेट झाले होते. या ६ जणांमधून कोणत्या स्पर्धकाला बाहेर जावे लागणार याची प्रेक्षकांना उत्सुकता होती.

author img

By

Published : Jun 10, 2019, 7:46 AM IST

'बिग बॉस'च्या घरातील पहिलं एलिमीनेशन, मैथिली जावकर घरातून बाहेर

मुंबई - कलर्स मराठीवरील 'बिग बॉस मराठी' सिझन २ हे पर्व बरेच चर्चेमध्ये आहे. अगदी पहिल्या दिवसापासून स्पर्धक त्यांच्या भांडणाने, वाद विवादाने घर गाजवत आहेत. अवघ्या बारा तेरा दिवसामध्ये घरात ग्रुप्स देखील तयार झाले आहेत. बिग बॉसच्या घरामध्ये आता नॉमिनेशन प्रक्रिया सुरु झाली असून या घरामधून आता दर आठवड्याला एका सदस्याला बाहेर जाणे अनिवार्य असणार आहे. नुकतंच घरातलं पहिलं एलिमीनेशन पार पडलं.

या आठवड्यामध्ये पराग कान्हेरे, अभिजीत केळकर, विणा जगताप, मैथिली जावकर, माधव देवचके आणि नेहा शितोळे हे घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेमध्ये नॉमिनेट झाले होते. या ६ जणांमधून कोणत्या स्पर्धकाला बाहेर जावे लागणार याची प्रेक्षकांना उत्सुकता होती. शेवटी अभिजीत केळकर आणि मैथिली जावकर हे डेंजर झोनमध्ये होते. यामधुन मैथिलीला अखेर बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर जावे लागणार आहे.

Maithili Javkar eliminated from Big boss marathi season 2

महेश मांजरेकर यांनी घरातून बाहेर आल्यावर मैथिलीला तिच्या घरामधल्या अनुभवाबद्दल विचारले. तेव्हा ती म्हणाली 'घरातले सर्वच स्पर्धक उद्धट आणि उर्मट आहेत. जे कोणाचंही ऐकत नाहीत. नेहा ही एकमेव मैत्रीण घरात बनल्याचे तिने सांगितले. तसंच घरात मला बिचुकले आणि माधव हे दोन भाऊ मिळाले, असंही ती म्हणाली.

बिग बॉस मराठीच्या सिझन २ मध्ये घरामधून बाहेर पडणारी पहिली सदस्य मैथिली जावकर ठरली. आता येत्या आठवड्यामध्ये कोण नॉमिनेट होईल? प्रेक्षकांचे मत कोणाला वाचवेल? आणि कोण घराबाहेर जाईल? हे बघणे रंजक ठरणार आहे.

Intro:कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सिझन २ हे पर्व बरेच चर्चेमध्ये आहे... अगदी पहिल्या दिवसापासून स्पर्धक त्यांच्या भांडणाने, वाद – विवादाने घर गाजवत आहेत...ईथे अवघ्या बारा तेरा दिवसामध्ये ग्रुप्स देखील तयार झाले आहेत... बिग बॉसच्या घरामध्ये आता नॉमिनेशन प्रक्रिया सुरु झाली असून या घरामधून आता दर आठवड्याला एका सदस्याला बाहेर जाणे अनिवार्य असणार आहे. या आठवड्यामध्ये पराग कान्हेरे, अभिजीत केळकर, विणा जगताप, मैथिली जावकर, माधव देवचके आणि नेहा शितोळे हे घराबाहेर जाण्याच्या प्रक्रीयेमध्ये नॉमिनेट झाले होते. आता या सहा जणांमधून आज कोणाला घरा बाहेर जावे लागेल हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक होते... शेवटी अभिजीत केळकर आणि मैथ्थिली जावकर हे डेंजर झोन मध्ये होते... आणि महेश मांजरेकर यांनी घोषित केले कि, या आठवड्यामध्ये मैथ्थिली जावकर हीला बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर जावे लागणार आहे.

महेश मांजरेकर यांनी घरातून बाहेर आल्यावर मैथ्थिलीला तिच्या घरामधल्या अनुभवाबद्दल विचारले, तेंव्हा ती म्हणाली माझ्यासोबत सगळेच अगदी उद्धट, उर्मट अगदी निवडून या घरामध्ये आणले आहेत, जे दुसऱ्यांचं अजिबात ऐकत नाहीत. घरामध्ये कोण तुला मित्र म्हणून मिळालं असं विचारले तेंव्हा मैथ्थिलीने सांगितले नेहा सोडून घरामध्ये सगळेच मला जवळचे होते आणि आहेत...सगळ्यांशी माझी घट्ट मैत्री झाली. बिचुकले यांनी मला धाकटी बहीण तर माधवने मला मोठी बहीण म्हंटल, मला या घरामध्ये दोन भाऊ मिळाले असे मी म्हणेन.

बिग बॉस मराठीच्या सिझन २ मध्ये घरामधून बाहेर पडणारी पहिली सदस्य मैथ्थिली जावकर ठरली. आता येत्या आठवड्यामध्ये कोण नॉमिनेट होईल ? प्रेक्षकांचे मत कोणाला वाचवेल ? आणि कोण घराबाहेर जाईल ? हे बघणे रंजक असणार आहे.Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.