ETV Bharat / sitara

‘नाय वरनभात लोन्चा...'चे दिग्दर्शक महेश मांजरेकरांनी चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्ये वगळली! - Films directed by Mahesh Manjrekar

‘नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा' या महेश मांजरेकर दिग्दर्शित चित्रपटाची सध्या भरपूर चर्चा होत आहे. यातील काही सीन्सना कात्री लावण्याची मागणी केली जात होती. अखेर महेश मांजरेकरांनी चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्ये वगळली आहेत.

नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा
नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा
author img

By

Published : Jan 13, 2022, 11:23 PM IST

मुंबई - ‘अठरा वर्षांवरील प्रेक्षकांनो, दम असलं तरच थेटरात येऊन बघायचं’! ही आहे ‘नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा' ची टॅग लाईन. तसं बघायला गेलं तर ही टॅग लाईन कॉंट्रोव्हर्शियल वाटते. खरंतर महेश मांजरेकरांनी अगदी सुरुवातीपासून हा चित्रपट ‘फक्त प्रौढांसाठी’ आहे हे जाहीर केले होते. ज्यांनी जयंत पवार यांची ‘नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा' ही मूळ कादंबरी वाचली असेल त्यांना माहीतच असेल की चित्रपटातील दृश्ये प्रक्षोभक असण्याची शक्यता आहे. खास निमंत्रितांसाठी असलेल्या शोमध्ये आमचे प्रतिनिधी कीर्तिकुमार कदम यांनी नुकताच हा चित्रपट पहिला.

“‘नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा' हा चित्रपट मूळ कादंबरीला पूर्ण न्याय देतो. दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी प्रत्येक दृश्य संवेदनशीलतेने हाताळले आहे. मानवी भावभावनांना पडद्यावर दर्शविताना सर्व प्रकारच्या मानवी स्वभावाच्या छटा, ज्यात स्त्रियादेखील मोडतात, त्यांनी प्रखरपणे मांडल्या आहेत. यातील महिलांच्या लैंगिक भावना आणि अपेक्षा दर्शविताना कुठेही पातळी सोडलेली नाही अथवा आक्षेपार्ह वाटावं असं चित्रित केलेलं नाहीये. भलेही चित्रपटात अर्वाच्य भाषाप्रयोग असला तरी तो कुठेही शिसारी आणणारा वाटत नाही. कलाकारांनीने शिविराळ भाषा अतिशय वास्तविकते पेश केली असून ती कुठेही खटकत नाही. यातील पात्रांसाठीच ती भाषा बनली असावी असे जाणवते आणि वास्तविक जीवनात अशा प्रकारची भाषा वापरणारे, स्त्रियांनी स्त्रियांसकट, प्रत्येकाने अनुभवले असतील.

सध्या सोशल मीडिया वापरणारी काही मंडळी अर्धवट किंवा तुटपुंज्या माहितीवर आपली मते नोंदवत असतात किंबहुना ‘ट्रोलिंग’ करीत असतात. पूर्ण सत्य माहित नसल्यावरही एखाद्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतात.

‘नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा' चित्रपटात कुठलेही ओंगळवाणे दृश्य नसून त्या-त्यावेळी कॅरॅक्टर्सच्या भावना दर्शविण्यात आल्या आहोत. स्त्रियांचा अनादर करणारी दृश्ये नाहीयेत आणि सुरुवातीलाच ही कथा काल्पनिक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. महेश मांजरेकरांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांच्या लिस्ट मध्ये
‘नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा' बरेच वरचे स्थान मिळवू शकतो”, आमचे प्रतिनिधी कीर्तिकुमार कदम यांनी अशी प्रतिक्रिया दिली.

परंतु ‘नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा' बाबतीत आरडाओरड सुरु झाल्यामुळे खुद्द महेश मांजरेकरांनी एक परिपत्रक जारी केले असून ते पुढीलप्रमाणे आहे. ते लिहितात.....“सर्वांचा आदर व मान राखून...'नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा' या चित्रपटाचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आल्यानंतर समाजातील बऱ्याच स्तरांमधून वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रीया उमटल्या आहेत. हा चित्रपट १८ वर्षे वयोगटापुढील प्रेक्षकांसाठीच असल्याने सेन्सॅार बोर्डानेही याला 'ए' प्रमाणपत्र दिले आहे. या चित्रपटाच्या प्रोमोमधील काही दृश्यांवर समाजातील काही घटकांनी आक्षेप घेतला असला तरी कोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा मुळीच हेतू नाही. समाजातून उमटणाऱ्या प्रतिक्रियांचा मान राखत आम्ही 'नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा'च्या प्रोमोमधून आक्षेपार्ह वाटणारी दृश्ये काढून टाकली आहेत. 'नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा'चा जुना ट्रेलर ज्या सोशल मीडिया प्लॅटफॅार्म्सवर प्रदर्शित करण्यात आला होता, त्या सर्व ठिकाणांहूनही काढण्यात आला असून, सुधारीत प्रोमो सर्वांना पाठवण्यात येत आहे. जुना प्रोमो त्वरीत काढून नवीन प्रकाशित करण्याच्या सूचनाही संबधित माध्यमांना करण्यात आल्या आहेत. चित्रपटाच्या निर्मितीसंस्थेपासून लेखक-दिग्दर्शक, कलावंत आणि तंत्रज्ञ असे आम्ही सर्व जण तमाम स्त्रियांचा मनापासून आदर करतो. समाजातील सर्व महिलांबद्दल आमच्या मनात आदराची भावना आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचा चुकीचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याचा आमचा अजिबात हेतू नाही. त्यामुळं प्रोमोच्या माध्यमातून काही चुकीचा संदेश समाजामध्ये जाणार नाही याचा कटाक्षाने प्रयत्न करण्यात आला आहे. असे असले तरीही 'नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा'च्या प्रोमोमधील काही दृश्यांतून कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर आम्ही त्याबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. आक्षेपार्ह वाटणारी दृश्ये केवळ प्रोमोमधूनच नव्हे, तर मुख्य चित्रपटातूनही वगळण्यात आली आहेत. सेन्सॅारने 'ए' सर्टिफिकेट दिल्यानंतरही जी दृश्ये संवेदनशील वाटतात आणि भविष्यात ज्याचा त्रास होऊ शकतो असे वाटते ती दृश्ये आम्ही चित्रपटातूनही वगळत आहोत. 'नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा'ची प्रसिद्धी सुरू करण्यात आली त्या क्षणापासून हा चित्रपट ‘केवळ प्रौढांसाठीच’ असल्याचे आम्ही प्रत्येक वेळी सांगितले आहे. तशा आशयाची ओळही सिनेमाच्या पोस्टरवर लिहिण्यात आली आहे. अठरा वर्षांखालील प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहण्यासाठी येऊ नये याची आम्ही योग्य ती काळजी घेतली आहे. जे यात दाखवण्यात आलेली वास्तवता पाहण्यास सक्षम आहेत, यातील दृश्यांचे गांभीर्य लक्षात घेऊ शकतात, यातील दाहकता सहन करू शकतात अशा प्रेक्षकांनीच हा चित्रपट पहावा अशी विनंतीही आम्ही सातत्याने केली आहे. हा सिनेमा विषयाच्या दृष्टीने थोडासा जड असून, सर्वसामान्य चित्रपटांसारखा नसल्याची माहितीही आम्ही देत आलो आहोत. मुंबईत तीन दशकांपूर्वी उद्धवलेली परिस्थिती आणि त्यातील दाहकता दाखवण्याचा प्रयत्न या सिनेमाद्वारे केला आहे. तरीही काही गोष्टी काहींना सहन करणे किंवा बघणे चुकीचं वाटत असेल त्यांच्यासाठी ही दृश्ये सिनेमातूनही पूर्णपणे काढण्यात आली आहेत.'नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा'च्या माध्यमातून एक वास्तववादी सिनेमा आपल्या भेटीला आणला आहे, १८ वर्षांवरील प्रत्येकानं सिनेमागृहात जाऊन हा सिनेमा बघावा. सिनेमा पूर्ण पाहिल्यावर आपला अभिप्राय कळवावा. धन्यवादमहेश वा. मांजरेकर”महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा' या शुक्रवारी १४ जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

हेही वाचा - Bikini Girl Archana Gautam : यूपी निवडणुकीत काँग्रेसकडून लढणार 'बिकिनी गर्ल' अर्चना गौतम

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.