मुंबई - कोरोना व्हायरसमुळे बॉलिवूड चित्रपटांचे शूटींग थांबले असून सर्व कलाकार होम क्वारंटाईन झालेत. आपल्या दैनंदिनीबद्दल ते चाहत्यांना नेहमी अपडेट करीत असतात. मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखही पतत्नीसह सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. यावेळी रितेशने एक रोमँटिक गाणे शेअर केले आहे.
संजय दत्तच्या 'साजन' या चित्रपटातील गाजलेल्या 'मेरा दिल भी कितना पागल है', या गाण्याचा रितेशने व्हिडिओ बनवलाय.
- View this post on Instagram
Love in Lockdown @geneliad ..... favourite song from Saajan.... @madhuridixitnene @duttsanjay
">
जगापासून अलिप्त असलेला रितेश आपल्या बाल्कनीत बसलेला दिसत आहे. गाणे सुरू होताना तो एकटा दिसतो. मात्र व्हिडिओत जेनेलियाही नंतर दिसते. या रोमँटिक गाण्यावर दोघेही प्रेम व्यक्त करताना दिसतात. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर सध्या खूप पसरला आहे.
सध्या देशभर लॉकडाऊन असून घरी थांबूनच कोरोना व्हायरसशी मुकाबला होऊ शकतो यासाठी बॉलिवूडचे सेलेब्रिटी जनजागृती करीत आहेत.