मुंबई - बॉलिवूड अभिनेता सनी कौशलने सांगितलंय की त्याच्या आगामी 'हुडदंग' चित्रपटातील त्याचा लूक नव्वदच्या दशकातील हिंदी चित्रपटाच्या नायकांसारखा असेल.
सनी म्हणाला, "जवळपास एक वर्षानंतर दद्दू ठाकूरच्या भूमिकेत परत येणे ही मजेशीर गोष्ट आहे. (लॉकडाऊनमुळे शूटिंग थांबविण्यात आले होते.) व्यक्तीरेखेचा लूक यात खूप महत्त्वाचा आहे. कारण हा चित्रपट १९९० वर आधारित आहे आणि मी अनिल कपूर यांचा फार मोठा चाहता आहे. दद्दूच्या लूकसाठी 'तेजाब' आणि 'राम लखन' यापासून प्रेरणा घेतली आहे.''
निखिल भट दिग्दर्शित या चित्रपटात नुसरत भरुचा आणि विजय वर्मा मुख्य भूमिकेत आहेत. गेल्या वर्षी या चित्रपटाच्या बऱ्याचशा भागाचे चित्रीकरण अलाहाबादमध्ये झाले होते.
सनी कौशल हा अभिनेता विक्की कौशलचा भाऊ आहे आणि 'आधिकारिक चूक्यागिरि' आणि 'द फॉरगॉटन आर्मी: आजादी के लिए' या वेब सिरीजमुळे त्याची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे.