मुंबई - अभिनेता कुणाल खेमूने २००५ मध्ये 'कलयुग' या चित्रपटातून मुख्य अभिनेता म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या सुंदर चित्रपटासाठी त्याने निर्मात्यांचे आभार मानले आहेत. १९९० च्या दशकात बाल कलाकार म्हणून हिंदी सिनेसृष्टीत आलेल्या कुणालने २००५ साली चित्रपटाचे पोस्टर इंस्टाग्रामवर शेअर केले आहे.
त्याने आपल्या फोटोसह लिहिले, "१५ वर्षांपूर्वी आजच्या दिवशी, देवाचे आभार मानतो, माझी त्वचेमुळे माझ्या वयाचा पत्ता लागत नाही. विशेष चित्रपटात ही खास संधी दिल्याबद्दल मोहित सुरींचे आभार. काय गाणी होती आणि काय कास्ट होती आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा एक विलक्षण अनुभव होता.''
हेही वाचा -आयुष शर्माने दाखवला 'अंतिम .. द फाइनल ट्रथ'मधील सलमानचा फर्स्ट लूक
कुणाल नुकताच आपल्या डिजिटल रिलीज 'लूटकेस' या चित्रपटामध्ये आणि थ्रिलर वेब-मालिकेच्या दुसर्या सत्रात 'अभय'मध्ये दिसला.
हेही वाचा -बॉब बिस्वास' अखेर झाला पूर्ण, ४३ दिवस चालले शुटिंग