मुंबई - 'बच्चन पांडे'मध्ये क्रिती सनॉन ही अक्षय कुमारची नायिका आहे. गेले महिनाभर या चित्रपटाचे चित्रीकरण जैसलमेर येथे सुरू आहे. क्रिती सनॉनचे या चित्रपटासाठीचे काम संपले असून ती मुंबईला परतली देखील व सर्वांसाठी एक गोड थँक्यू मेसेज देखील पोस्ट केला. त्याचसोबत तिने आपला व अक्षयचा लूक रिव्हील करणारा एक फोटो सुद्धा पोस्ट केला.
'बच्चन पांडे' हा चित्रपट नाडियादवाला ग्रँडसन एंटरटेनमेंटच्या बॅनर खाली बनत असून अभिनेता अक्षय कुमार आणि निर्माता साजीद नाडियादवाला या जोडीने यापूर्वीही अनेक चित्रपट सोबत काम केले आहे. वक्त हमारा हैं, मुझसे शादी करोगी, जान ए मन, हे बेबी, कंबख्त इष्क आणि हाऊस फूलचे चार भाग इत्यादी चित्रपटांतून ही निर्माता-अभिनेता जोडी एकत्र आली असून हे सर्वच चित्रपट हिट म्हणून घोषित झालेले आहेत.
बच्चन पांडेचे शूट संपवून मुंब ला परतताना क्रिती सनॉनला साजीद नाडियादवाला व त्याच्या कुटुंबीयांची कंपनी होती. अक्षय कुमार या चित्रपटात एका गँगस्टरची भूमिका करत आहे. जो फिल्मवेडा आहे आणि त्याला सिनेमात हिरो बनायचे आहे. या चित्रपटात अर्शद वारसी, प्रतीक बब्बर, जॅकलीन फर्नांडिझ यांच्यादेखील महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
साजीद नाडियादवाला निर्मित, फरहाद सामजी दिग्दर्शित 'बच्चन पांडे' 26 जानेवारी, 2022 ला प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा - नेहा कक्करने केली जेष्ठ गीतकार संतोष आनंद यांची आर्थिक मदत