ETV Bharat / sitara

...म्हणून किंग खानने अबरामला सोबत घेऊन केलं मतदान

author img

By

Published : Apr 30, 2019, 12:59 PM IST

शाहरुख आपल्या अभिनयाबाबत जेवढा जागरूक आहे. तेवढाच त्याच्या कुटुंबाप्रती देखील तो जबाबदार असल्याचे पाहायला मिळते. अनेकदा तो कुटुंबासोबत वेळ घालवताना दिसतो.

...म्हणून किंग खानने अबरामला सोबत घेऊन केलं मतदान

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान काल (२९ एप्रिल) पार पडले. मुंबईत झालेल्या या मतदानात बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मुंबईच्या वांद्रे येथील मतदान केंद्रावर किंग खान शाहरुखनेही मतदानाचे कर्तव्य पार पाडले. यावेळी त्याच्यासोबत गौरी आणि चिमुकला अबरामही सोबत होता. शाहरुखने तिघांचा हा फोटो शेअर करून अबरामला मतदान केंद्रावर का नेले, याचा खुलासा केला आहे.

शाहरुख आपल्या अभिनयाबाबत जेवढा जागरूक आहे. तेवढाच त्याच्या कुटुंबाप्रती देखील तो जबाबदार असल्याचे पाहायला मिळते. अनेकदा तो कुटुंबासोबत वेळ घालवताना दिसतो. त्याचा छोटा मुलगा अबराम हा नेहमी त्याच्यासोबत दिसतो. मतदान केंद्रावरही अबरामने कॅमेरांचे लक्ष वेधले.

King Khan On Reason behind abram at polling booth

अबरामला मतदानाची प्रक्रिया कळावी, यासाठी त्यांनी अबरामला सोबत आणले होते. त्याला बोटींग आणि वोटींग यांच्यात नेमका काय फरक असतो, हे समजावून सांगण्यासाठी त्याला मतदान केंद्रावर सोबत नेले, असे शाहरुखने एका पोस्टद्वारे स्पष्ट केले आहे.

Intro:Body:

dummy

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.