भोपाळ - मध्यप्रदेश येथील पर्यटन नगरी अशी ओळख असलेल्या खजुराहो येथे आजपासून (१७ डिसेंबर) 'आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव' आयोजित करण्यात आला आहे. पुढील ७ दिवस हा महोत्सव सुरू राहणार आहे. या महोत्सवाचा शुभारंभ सोहळा मुख्यमंत्री कमल नाथ यांच्या हस्ते पार पडला.
मुख्यमंत्री कमल नाथ हे या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी आज सकाळीच ५ वाजता विशेष विमानाने रवाना झाले आहेत. आज सकाळी ६.३० च्या दरम्यान या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला.
या महोत्सवात हिंदी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध कलाकार उपस्थित राहणार आहेत. यामध्ये कैलाश खैर, पूनम ढिल्लो, पद्मिनी कोल्हापुरे आणि अलका याज्ञिक यांचा समावेश आहे.
हेही वाचा -नवे 'बंटी' आणि 'बबली' पुन्हा धुमाकुळ घालण्यासाठी सज्ज
कलाकारांसोबत यावेळी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. मोबाईल फिल्म मेकिंग कार्यशाळा, नाटक, स्थानिक कला आणि संस्कृतीला प्राधान्य देणारे कार्यक्रम, हर्बल वन मेळावा, पशु मेळावा यांसारख्या कार्यक्रमाचे आयोजनही या महोत्सवात करण्यात आले आहे.
हेही वाचा -शिल्पा शेट्टीचे पुनरागमन व अभिमन्यूचे पदार्पण असलेल्या 'निकम्मा'च्या रिलीजची तारीख ठरली