मुंबई - अभिनेता विकी कौशलच्या आगामी 'भूत - द हॉन्टेड शिप' हा चित्रपट २१ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. त्यापूर्वी बॉलिवूड कलाकारांसाठी या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान बऱ्याच बॉलिवूड कलाकारांनी यावेळी हजेरी लावली होती. अभिनेत्री कॅटरिना कैफनेही हा चित्रपट पाहून आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
बऱ्याच दिवसांपासून कॅटरिना आणि विकी कौशलच्या नात्याविषयी कलाविश्वात चर्चा पाहायला मिळते. दोघेही एकमेकांना लपूनछपून डेट करत असल्याचेही बोलले जात आहे. अनेक कार्यक्रमात दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आले. तसेच, डिनर डेटलाही दोघांना सोबत पाहिले गेले आहे. त्यामुळे दोघांमध्ये नक्की काहीतरी सुरू असल्याचा अंदाज लावण्यात येत आहेत. अश्यात कॅटरिनाने विकीच्या चित्रपटावर दिलेली प्रतिक्रियेनेही या चर्चांना हवा मिळाली आहे.
हेही वाचा -रोहित शेट्टीच्या अॅक्शन चित्रपटात साकारायची भूमिका, आयुष्मानने व्यक्त केली इच्छा
कॅटरिनाने या चित्रपटाचे पोस्टर इन्स्टास्टोरीमध्ये शेअर करुन 'आऊटस्टँडिंग' अशी प्रतिक्रिया दिली आहे. हा चित्रपट नक्की पाहा, असेही तिने यामध्ये लिहिले आहे.
विकीने कॅटरिनाने दिलेल्या या प्रतिक्रियेचे आभार मानले आहेत.
'भूत' चित्रपटाचे दिग्दर्शन भानू प्रताप सिंग यांनी केले आहे. हा चित्रपट आयुष्मान खुरानाच्या 'शुभ मंगल ज्यादा सावधान' चित्रपटाला टक्कर देण्यासाठी उद्या म्हणजेच २१ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. आता या दोन्ही चित्रपटांपैकी बॉक्स ऑफिसवर कोणता चित्रपट बाजी मारतो, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा -'इंडियन-२'च्या सेटवरील अपघातग्रस्तांना कमल हासन करणार एक कोटींची मदत!