ETV Bharat / sitara

अक्षय कुमार नाही, तर 'हा' अभिनेता बनणार मांत्रिक, 'भूल भुलैय्या २'चं पोस्टर प्रदर्शित - भूल भुलैय्या २

२००७ साली प्रदर्शित झालेल्या भूल भुलैय्याचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अक्षय कुमारने या चित्रपटात मांत्रिकाची भूमिका साकारली होती. मात्र, आता 'भूल भुलैय्या २'मध्ये अक्षय एवजी दुसऱ्या अभिनेत्याची वर्णी लागली आहे.

'भूल भुलैय्या २'चं पोस्टर प्रदर्शित
author img

By

Published : Aug 19, 2019, 9:34 AM IST

मुंबई - अक्षय कुमारचा सुपरहिट हॉरर कॉमेडी असलेल्या भूल भुलैय्याचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २००७ साली प्रदर्शित झालेला या चित्रपटाची आजही चाहत्यांमध्ये क्रेझ पाहायला मिळते. अक्षय कुमारने या चित्रपटात मांत्रिकाची भूमिका साकारली होती. मात्र, आता 'भूल भुलैय्या २'मध्ये अक्षय एवजी कार्तिक आर्यनची वर्णी लागली आहे. या चित्रपटाचं फर्स्ट लूक पोस्टरही प्रदर्शित करण्यात आले आहे.

'१३ साल बाद', असे कॅप्शन देऊन कार्तिकने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर 'भूल भूलैय्या २' चं फर्स्ट लूक पोस्टर शेअर केलं आहे. या चित्रपटात भूमिका साकारण्याची संधी मिळाल्यामुळे तो फार उत्साही आहे.

या पोस्टरमध्ये एका मांत्रिकाच्या रुपात, गळ्यात रुद्राक्षांची माळ असणारा, मानवी सांगाड्यांमद्ये बसलेला आणि चेहऱ्यावर वेगळेच भाव कार्तिकच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतात.

या चित्रपटाचं दिग्दर्शन अनिस बजमी हे करत आहेत. कार्तिकसोबत आणखी कोणते कलाकार यामध्ये झळकणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र, पहिल्या पोस्टरनंतर चाहत्यांना चित्रपटाबद्दल बरीच उत्सुकता लागली आहे. पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होईल.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.