ETV Bharat / sitara

'पती-पत्नी और'च्या भूमिकेतील कार्तिक-भूमी अन् अनन्याचा फर्स्ट लूक प्रदर्शित - पती -पत्नी और

कार्तिक आर्यन या चित्रपटात 'चिंटू त्यागी' ही भूमिका साकारत आहे. तर, भूमी पेडणेकर त्याच्या पत्नीच्या रुपात दिसणार आहे. या दोघांचाही फर्स्ट लूक नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

'पती -पत्नी और'च्या भूमिकेतील कार्तिक - भूमी आणि अनन्याचा फर्स्ट लूक प्रदर्शित
author img

By

Published : Oct 15, 2019, 4:41 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन, भूमी पेडणेकर आणि अनन्या पांडे यांच्या 'पती पत्नी और वो' या चित्रपटाची सध्या शूटिंग सुरू आहे. हा चित्रपट संजीव कुमार यांच्या चित्रपटाचा रिमेक आहे. कार्तिक आर्यन या चित्रपटात 'चिंटू त्यागी' ही भूमिका साकारत आहे. तर, भूमी पेडणेकर त्याच्या पत्नीच्या रुपात दिसणार आहे. या दोघांचाही फर्स्ट लूक नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

कार्तिकच्या फोटोवर 'पती' असे कॅप्शन देऊन त्याचा चिंटू त्यागीच्या रुपातील फोटो शेअर करण्यात आला आहे. 'लिजिये खतम हो गया इंतजार, आ गये हालात के शिकार', अशी टॅगलाईनही त्याच्या फोटोवर पाहायला मिळतो.

तर, दुसरीकडे भूमी पेडणेकरचाही लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. ती या चित्रपटात शिक्षिकेच्या रुपात दिसणार आहे. तिच्या हातात भौतिकशास्त्राचं पुस्तक असल्याचं पाहायला मिळतं. 'जरा हाय मेंटेनन्स है हम इमोशनली', अशी टॅगलाईन तिच्या फोटोवर देण्यात आली आहे.

अनन्या पांडेचाही ग्लॅमरस लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटात ती 'पती पत्नी मधील 'वो'ची भूमिका साकारत आहे. 'ये अग्नीपथ है, इसे कोई पार नही कर सकता', अशी टॅगलाईन तिच्या पोस्टरवर देण्यात आली आहे.

हेही वाचा -एक नाही तर २ चित्रपटांची घोषणा करणार 'किंग खान'?

चित्रपटाच्या तिनही कॅरेक्टर पोस्टरवरुन आता प्रेक्षकांना ट्रेलरची आतुरता लागली आहे. लवकरच या चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित केला जाणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन मुद्दस्सर अजिज हे करत आहेत. ६ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होईल.

हेही वाचा -'धक धक गर्ल'च्या गाण्यावर 'दंगल गर्ल'ने धरला ठेका, व्हिडिओ व्हायरल

Intro:Body:

entertainment

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.