मुंबई - बॉलिवूडचा आघाडीचा दिग्दर्शक करण जोहर, अभिनेत्री करिना कपूर खान आणि करिश्मा कपूर यांनी 'कभी खुशी कभी गम' चित्रपटातील 'बोले चुडियां' या गाण्यावर डान्स केला. अरमान जैनच्या लग्नात त्यांच्या या डान्सने धमाल उडवली होती. त्यांच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
अरमान जैन आणि अनिसा मल्होत्राच्या वेडिंग रिसेप्शनमध्ये बऱ्याच बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. या सर्वांनी बॉलिवूडच्या गाण्यांवर धमाल डान्सही केला.
हेही वाचा -अरमान जैनच्या लग्नात शाहरुख-गौरीचा 'कजरा रे' डान्स, व्हिडिओ व्हायरल
करिना कपूरने 'कभी खुशी कभी गम' या चित्रपटात 'पूजा'ची भूमिका साकारली होती. 'बोले चुडिया' हे गाणं आजही प्रचंड लोकप्रिय आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
अरमान जैनच्या लग्नात करिना आणि करिश्माचा ट्रॅडिशनल अवतार पाहायला मिळाल्या. त्यांचे बरेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
हेही वाचा -'बॉब विश्वास'च्या सेटवरील अभिषेक बच्चनची झलक, पाहा व्हिडिओ