मुंबई - अभिनेत्री करिना कपूर आपले काका ऋषी कपूर यांच्या निधनानंतर अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करीत आहे. तिने आता एक शेअर केलेला फोटो क्रिकेटच्या मैदानातला आहे. यात तिचे सासरे नवाब मन्सूर अली खान पतौडी आणि ऋषी कपूर मैदानात दिसत आहेत. हा फोटो खूप जुना असून दोघेही खूप सुंदर दिसत आहेत. या फोटोवर तिची बहिण करिश्मासह अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
ऋषी कपूर यांचे ३० एप्रिल रोजी सकाळी पावने नऊ वाजता निधन झाले. गेल्या काही महिन्यापासून ते दुर्धर आजाराशी झुंझत होते. त्यांना श्वास घ्यायला त्रास सुरू झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर काल अंत्यसंस्कार पार पडले. त्यांची मुलगी रिद्धीमा मुंबईत पोहोचू शकली नव्हती. ती आज दाखल होणार आहे.