मुंबई - 'लॅक्मे फॅशन विक २०१९'मध्ये सध्या बॉलिवूड सेलिब्रिटींचा जलवा पाहायला मिळत आहे. अनन्या पांडे, आयुष्मान खुराना, दिशा पटाणी, अर्जुन कपूर, यांचा रॅम्पवॉकवर खास अंदाज पाहायला मिळाला. तर, बॉलिवूडची 'बेबो' करिना कपूर खान हिनेही आपल्या हॉट अदांनी रॅम्पवर चार चॉंद लावले.
करिना यावेळी काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये पाहायला मिळाली.
तिने ऑफ शोल्डर गाऊन परिधान केला होता. यावर तिच्या डार्क स्मोकी लूकने तिचे सौंदर्य वाढवले होते.
करिना ही बॉलिवूडची फॅशन ऑयकॉन मानली जाते.
गौरी आणि नैनिकाने डिझाईन केलेल्या ड्रेसमध्ये तिने रॅम्पवॉक केला.