ETV Bharat / sitara

'मेलोड्रामा माझ्या डीएनएमध्येच आहे' - करण जोहर - takht news

करण जोहरने 'कुछ कुछ होता है' चित्रपटातून त्याने दिग्दर्शनीय पदार्पण केलं होतं. त्यानंतर त्याच्या 'कभी अलविदा ना केहना' या चित्रपटानेही चाहत्यांची मने जिंकली.

'मेलोड्रामा माझ्या डीएनएमध्येच आहे' - करण जोहर
author img

By

Published : Sep 21, 2019, 9:09 AM IST

मुंबई - बॉलिवूडचा आघाडीचा दिग्दर्शक करण जोहरने आजवर बरेच सुपरडुपरहिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. 'कुछ कुछ होता है' ते 'कभी खुशी कभी गम' यांसारखे चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात रुजलेले आहेत. वर्षानुवर्षापासून या चित्रपटांची क्रेझ पाहायला मिळते. करण जोहरचे चित्रपट म्हटले की त्यामधे भरभरुन मेलोड्रामा पाहायला मिळतो. याबद्दल बोलताना करण म्हणाला, की 'मेलोड्रामा माझ्या डीएनएमध्येच आहे आणि मी एक ड्रामा क्विन'.

एका माध्यमाशी करण जोहरने संवाद साधला. दरम्यान त्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत, चित्रपटांबाबत बरेचसे किस्से उलगडले.

करण जोहरने 'कुछ कुछ होता है' चित्रपटातून त्याने दिग्दर्शनीय पदार्पण केलं होतं. त्यानंतर त्याच्या 'कभी अलविदा ना केहना' या चित्रपटानेही चाहत्यांची मने जिंकली. काही वर्षांपूर्वीच प्रदर्शित झालेला 'ऐ दिल है मुश्किल' या चित्रपटालाही संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या.

हेही वाचा -जयललिता यांच्या बायोपिकसाठी कंगना रनौत 'अशी' करतेय तयारी, पाहा फोटो

मेलोड्रॅमॅटिक चित्रपटांबाबत त्याने आपलं मत मांडल. तो म्हणाला, की 'भारतीय प्रेक्षकांना नेमकं काय हवं असतं, ते मला चांगल्या प्रकारे समजतं. त्यामुळे जेही मला त्यांना चांगल देता येईल, ते मी देत असतो. चित्रपटांमधील भावनेंचं मोजमाप करता येणं शक्य नाही. त्यामुळे त्यामध्ये दाखवण्यात येणाऱ्या भावना नेमक्या कशा असतात, यावर चित्रपटाच्या यशाचं गणीत आधारित असतं'

करण जोहरच्या निर्मिती खाली तयार झालेल्या 'कलंक' चित्रपटाच्या अपयशावरही त्याने संवाद साधला. भव्यदिव्य सेट्स, तगडे कलाकार असूनही कथानकाची मांडणी प्रेक्षकांना भावली नाही. त्यामुळे या अपयशातूनही एक अनुभव आल्याचं तो म्हणाला.

हेही वाचा -सलमान खान पुन्हा होणार 'मामा', आयुष-अर्पिताने दिली 'गुडन्यूज'

आता पुन्हा एकदा तो 'तख्त' चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहे. सध्या या चित्रपटाचं शूटिंग सुरू आहे. यामध्ये देखील तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. रणवीर सिंग, करिना कपूर खान, आलिया भट्ट, विकी कौशल, भूमी पेडणेकर, जान्हवी कपूर आणि अनिल कपूर यांसारख्या कलाकारांची भूमिका पाहायला मिळणार आहे.

Intro:Body:

ashwini

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.