ETV Bharat / sitara

अभिनेता चिरंजीवी सरजा यांचे निधन, ३९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास - kannnada actor chiranjeevi no more

कन्नड सुपरस्टार अर्जुन सरजा यांचे पुतणे चिरंजीवी यांच्यावर बंगळुरुच्या जयनगरमधील सागर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका आला. यातच त्यांचा मृत्यू झाला. चिरंजीवी यांच्या घशाचे स्वॅबही तपासणीसाठी पाठवण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे.

chiranjeevi sarja dies
अभिनेता चिरंजीवी सरजा यांचे निधन
author img

By

Published : Jun 7, 2020, 6:43 PM IST

मुंबई - कन्नड सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता चिरंजीवी सरजा यांचे आज निधन झाले. शनिवारी छातीत दुखत असल्याने तसेच श्वासोच्छवासाच्या समस्येमुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान वयाच्या 39 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

कन्नड सुपरस्टार अर्जुन सरजा यांचे पुतणे चिरंजीवी यांच्यावर बंगळुरुच्या जयनगरमधील सागर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका आला. यातच त्यांचा मृत्यू झाला. चिरंजीवी यांच्या घशाचे स्वॅबही तपासणीसाठी पाठवण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे.

चिरंजीवी यांनी २०१८ मध्ये अभिनेत्री मेगना राजसोबत लग्नगाठ बांधली होती. २००९ मध्ये वायुपुत्र या चित्रपटाद्वारे त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. अभिनेत्याने आतापर्यंत २२ हून अधिक सिनेमांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.