मुंबई - अभिनेत्री कंगना रनौत आणि राजकुमार राव यांची जोडी असलेला 'मेंटल है क्या' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. या मोशन पोस्टरमध्ये कंगना आणि राजकुमार रावचा रॉयल अंदाज पाहायला मिळतोय.
या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. येत्या २१ जूनला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती एकता कपूरने केले आहे. तर, दिग्दर्शन प्रकाश कोवेलामुडी यांनी केले आहे.
राजकुमार आणि कंगना या चित्रपटाच्या निमित्ताने दुसऱ्यांदा एकत्र येत आहेत. यापूर्वी ते 'क्विन' चित्रपटात एकत्र झळकले होते.

एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, या चित्रपटात कंगनापूर्वी करिना कपूर खानची निवड करण्यात आली होती. मात्र, करिनाने नकार दिल्यानंतर यामध्ये कंगनाची वर्णी लागली.
