ETV Bharat / sitara

नव्या नावासोबत प्रदर्शित होणार कंगना-राजकुमारचा 'मेंटल है क्या'? - social media

कंगना आणि राजकुमारचे काही मोशन पोस्टर्स प्रदर्शित करण्यात आले आहेत. या पोस्टर्समध्ये कंगना आणि राजकुमारचा चित्रविचित्र लूक पाहायला मिळतो. या चित्रपटातील काही महत्वपूर्ण भाग देखील काढण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.

नव्या नावासोबत प्रदर्शित होणार कंगना-राजकुमारचा 'मेंटल है क्या'?
author img

By

Published : Jun 28, 2019, 9:35 AM IST

Updated : Jun 28, 2019, 11:16 AM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत आणि अभिनेता राजकुमार राव यांचा 'मेंटल है क्या' या चित्रपटाची बऱ्याच दिवसापासून चर्चा सुरू आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच अनेक वादविवादात अडकला आहे. अलिकडेच कंगनाने सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनला (CBFC) भेट दिली. या त्यांच्या मिटिंगमध्ये या चित्रपटाच्या नावामध्ये आणि काही सिनमध्ये बदल करण्याचे सुचविण्यात आले आहेत. मात्र, या चित्रपटाच्या नावात अद्याप बदल झाला नाही. तरीही लवकरच या चित्रपटाला नवे नाव देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.
एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, या चित्रपटाची निर्मिती बालाजी मोशन पिक्चर्स अंतर्गत होत आहे. लवकरच निर्माते या चित्रपटाच्या नावाबाबत आपला निर्णय जाहीर करतील, असेही सांगण्यात येत आहे.

या चित्रपटाच्या शिर्षकामुळे हा चित्रपटात वादात अडकला आहे. इंडियन सायक्रॅटिक सोसायटी तर्फे प्रसून जोशी यांना याबाबत पत्र देखील पाठविण्यात आले होते. त्यात या शिर्षकावर आक्षेप घेण्यात आला होता.

कंगना आणि राजकुमारचे काही मोशन पोस्टर्स प्रदर्शित करण्यात आले आहेत. या पोस्टर्समध्ये कंगना आणि राजकुमारचा चित्रविचित्र लूक पाहायला मिळतो. या चित्रपटातील काही महत्वपूर्ण भाग देखील काढण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.

आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाला फार कमी वेळ उरलेला आहे. आत्तापर्यंत या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला नाही. मात्र, काही पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहेत. आता चाहत्यांना या चित्रपटाच्या ट्रेलरची प्रतिक्षा आहे. २६ जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Jun 28, 2019, 11:16 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.