मुंबई - अभिनेता अनुपम खेर सोशल मीडियात नेहमी सक्रिय असतात. आपल्या कॉमेंट्समुळे ते नेहमी चर्चेत तर कधी वादात राहतात. दुसऱ्या बाजूला कंगना रानावत नेहमी इतर कलाकारांवर निशाणा साधत प्रसिध्दीत राहते. तिने केलेली राजकीय विधानेही चर्चेचा विषय असतात. अशा या कंगनाला अनुपम खेर महिला सशक्तीकरणाचे उत्तम उदाहरण असल्याचे म्हणातात.
अनुपम खेर यांनी अलिकडेच कंगनासोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. कंगना आपली आवडती अभिनेत्री असून तिला भेटून आनंद होतो, असेही खेर यांनी म्हटलंय.
या फोटोत कंगना पांढऱ्या रंगाच्या कपड्यात दिसून येत आहे. तर अनुपम खेर पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि डेनीम जीन्समध्ये दिसत आहेत.
विशेष म्हणजे मणिकर्णिका चित्रपटानंतर बॉलिवूड तारे तारकांवर कंगना भडकली होती. यावेळी तिने आलिया भट्टवरही हल्ला बोल केला होता. यावेळी अनुपम खेर कंगनाच्या पाठीशी ठाम राहिले होते.