मुंबई - तामिळनाडूच्या दिवंगत माजी मुख्यमंत्री जयललिता यांची आज जयंती आहे. त्यांच्या जीवनावर आधारित 'थलायवी' या बायोपिकची सध्या निर्मिती करण्यात येत आहे. या बायोपिकमध्ये अभिनेत्री कंगना रनौत मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटात जयललिता यांची हुबेहुब भूमिका साकारण्यासाठी कंगनाच्या लुकवर विशेष मेहनत घेण्यात आली आहे. जयललिता यांच्या जयंतीनिमित्त कंगनाचा या चित्रपटातील नवा लुक समोर आला आहे.
कंगनाची बहीण रंगोली चंडेल हिच्या सोशल मीडिया पेजवर कंगनाचा हा नवा लुक शेअर करण्यात आला आहे. या फोटोमध्ये कंगना हुबेहुब जयललिता यांच्यासारखीच दिसते.
-
Kangana in and as #Thalaivi ... without any prosthetics or any special effets Kangana looks like Jaya Amma, shocking, determination can make anything happen #Thalaivi pic.twitter.com/Dtm8wu5fwH
— Rangoli Chandel (@Rangoli_A) February 24, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Kangana in and as #Thalaivi ... without any prosthetics or any special effets Kangana looks like Jaya Amma, shocking, determination can make anything happen #Thalaivi pic.twitter.com/Dtm8wu5fwH
— Rangoli Chandel (@Rangoli_A) February 24, 2020Kangana in and as #Thalaivi ... without any prosthetics or any special effets Kangana looks like Jaya Amma, shocking, determination can make anything happen #Thalaivi pic.twitter.com/Dtm8wu5fwH
— Rangoli Chandel (@Rangoli_A) February 24, 2020
हेही वाचा -'बॉलिवूड म्यूझिकल नाईट'मध्ये अलका याज्ञिकसह उदित नारायण यांच्या स्वरांचा नजराणा
काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. या टीझरमध्ये जयललिता यांचा कलाविश्व ते राजकीय प्रवास कसा होता, याची झलक दाखवण्यात आली. प्रोस्थेटिक मेकअप द्वारे कंगनाचा लुक तयार करण्यात आला आहे. या लुकवरुन काही जणांनी तिची खिल्ली उडवली. तर, काहींनी मात्र, तिच्या लुकची प्रशंसा केली आहे.
क्रांतीकारी नेत्या म्हणून जयललिता यांची ओळख आहे. 'थलायवी' या चित्रपटात त्यांच्या राजकिय कारकिर्दीतील महत्वपूर्ण घडामोडी पाहायला मिळणार आहेत. हा चित्रपट हिंदीसोबतच तमिळ आणि तेलुगू भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे. दाक्षिणात्य अभिनेता अरविंद स्वामी यांचीही या चित्रपटात भूमिका आहे. ते या चित्रपटात एमजीआर यांची भूमिका साकारताना दिसणार आहेत.
हेही वाचा -'तुझी दररोज आठवण येते', श्रीदेवींच्या आठवणीत जान्हवी भावुक
विजय यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर, विष्णू वर्धन इंदुरी आणि शैलेश आर. सिंग यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट जून महिन्यात प्रदर्शित होणार आहे.