चेन्नई - अभिनेत्याचा राजकीय नेता बनलेल्या कमल हासन यांनी कोरोना व्हायरसच्या ईलाजासाठी आपल्या घराचे रुग्णालय बनवण्याचा संकल्प केलाय.
हासन यांनी ट्विट करीत म्हटलंय की, डॉक्टरांच्या मदतीने आपल्या घराचे रुग्णालय बनवण्याची त्यांची तयारी आहे. ते राहात असलेल्या घरात रुग्णालय करण्यासाठी सरकराची परवानगी मिळताच ते याची कार्यवाही सुरू करतील.
यापूर्वी एक बातमी आली होती की, कमल हासन आणि त्यांचा पूर्ण परिवार पत्नी सारिका आणि मुली श्रृती आणि अक्षरा वेगवेगळ्या शहरात सेल्फ आयसोलेशनमध्ये राहात आहेत.
श्रृतीने मीडियाला सांगितले होते की, ''मला आता हिशोबात राहण्याची सवय झाली आहे. मुश्किल गोष्ट ही आहे की ,तुमच्या जवळ बाहेर जाण्याचा कोणताच मार्ग नाही आणि याची भीती वाढत आहे. गेल्या काही दिवसापासून लोकांनी ही गोष्ट गांभिर्याने घ्यायला सुरूवात केली आहे. मी जेव्हा परतले तेव्हा शूटींग रद्द झाली होती. माझा परिवार सेल्फ आयसोलेशनमध्ये आहे. पापा (कमल हासन) आणि अक्षरा चेन्नईमध्ये वेगवेगळ्या घरात राहात आहेत.
''आमच्या सर्वाचे वेगवेगळे ट्रॅव्हल शेड्यूल होते. त्यामुळे एकाच वेळी आयसोलेशनमध्ये जाण्याचा प्रश्नच तयार झाला नाही. मला वाटतं लोकांनी हा निर्णय घ्यायला हवा.''
कमल हासन यांची पत्नी सारिका आणि मोठी मुलगी श्रृती हासन मुंबईतील एका अपार्टमेंटमध्ये वेगवेगळे राहात आहेत. तर कमल हासन आणि त्यांची मुलगी अक्षरा चेन्नईत दोन वेगवेगळ्या घरात आयसोलेशनमध्ये राहात आहेत.
श्रृतीने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित लोकांना वेगवेगळे राहण्याचा आवाहन केले होते. याशिवाय बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान, अक्षय कुमार, कार्तिक आर्यन, कॅटरीना कैफ, प्रियंका चोप्रा, शिल्पा शेट्टी इत्यादी सेलेब्स क्वारंटाइनमध्ये राहात आहेत. लोकांनी सेल्फ-आइसोलेशन, सेल्फ-क्वारंटाइन आणि सोशल डिस्टन्सिंगमध्ये राहण्याचे आवाहन करीत आहेत.