मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री काजोल लवकरच 'देवी' या शॉर्टफिल्ममधुन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी तिने या शॉर्टफिल्म विषयी माहिती दिली होती. यामध्ये ती मुख्य भूमिका साकारणार आहे. या शॉर्टफिल्मचं फर्स्ट लुक पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे.
निरांजन अय्यंगर आणि रेयान स्टिफन्स इलेक्ट्रिक अॅपल एंटरटेनमेंट यांच्यावतीने या शॉर्टफिल्मची निर्मिती करण्यात येत आहे. तर, प्रियांका बॅनर्जी दिग्दर्शन करत आहेत.
-
#Kajol, #ShrutiHaasan, #NehaDhupia, #NeenaKulkarni, #MuktaBarve, #SandhyaMhatre, #RamaJoshi, #ShivaniRaghuvanshi and #YashaswiniDayama... #FirstLook poster of short film #Devi... Directed by Priyanka Banerjee... Produced by Ryan Stephen and Niranjan Iyengar. pic.twitter.com/BHX2evaC2C
— taran adarsh (@taran_adarsh) February 20, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#Kajol, #ShrutiHaasan, #NehaDhupia, #NeenaKulkarni, #MuktaBarve, #SandhyaMhatre, #RamaJoshi, #ShivaniRaghuvanshi and #YashaswiniDayama... #FirstLook poster of short film #Devi... Directed by Priyanka Banerjee... Produced by Ryan Stephen and Niranjan Iyengar. pic.twitter.com/BHX2evaC2C
— taran adarsh (@taran_adarsh) February 20, 2020#Kajol, #ShrutiHaasan, #NehaDhupia, #NeenaKulkarni, #MuktaBarve, #SandhyaMhatre, #RamaJoshi, #ShivaniRaghuvanshi and #YashaswiniDayama... #FirstLook poster of short film #Devi... Directed by Priyanka Banerjee... Produced by Ryan Stephen and Niranjan Iyengar. pic.twitter.com/BHX2evaC2C
— taran adarsh (@taran_adarsh) February 20, 2020
हेही वाचा -'माझ्या नावाचा वापर करु नको', नेहा कक्कडने हिमांशला भरला सज्जड दम
यामध्ये काजोलसोबत श्रृती हासन, निना कुलकर्णी, मुक्ता बर्वे, संध्या म्हात्रे, रमा जोशी, शिवानी रघुवंशी, नेहा धुपिया आणि यशस्विनी दायमा यांच्याही महत्वपूर्ण भूमिका पाहायला मिळणार आहेत.
काजोलची ही पहिली शॉर्टफिल्म आहे. या शॉर्टफिल्म बद्दल सांगताना ती म्हणाली, की 'देवीच्या कथेपेक्षा आणखी चांगला विषय कोणताच नाही. प्रियांका बॅनर्जी यांनी अतिशय धाडसी कथा लिहिली आहे. यामध्ये मी 'ज्योती'ची भूमिका साकारत आहे. आज स्त्रियांवरील अत्याचार, स्त्री- पुरूष असमानता यांसारख्या गोष्टींना सतत सामोरे जावे लागते. 'देवी' हा अशाच आशयावर आधारित असलेली शॉर्ट फिल्म आहे'.