ETV Bharat / sitara

B'Day Spl: 'या' गाण्यामुळे कैलाश खेर बनले सुरांचे बादशाह, एकेकाळी झाले होते डिप्रेशनची शिकार

कैलाश यांचा गायनाचा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. त्यांनी जेव्ह गायनातच करिअर करण्याचे ठरवले होते, तेव्हा त्यांच्या घरातून त्यांनी विरोध झाला होता. मात्र, तरीही ते त्यांच्या निर्णयावर ठाम होते. वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांनी गायनासाठी घर सोडले होते.

कैलाश खेर
author img

By

Published : Jul 7, 2019, 8:33 AM IST

मुंबई - बॉलिवूडमध्ये सूफी गाण्यांचे सरताज म्हणून ओळखले जाणारे कैलाश खेर यांचा आज वाढदिवस आहे. ७ जुलै १९७३ साली त्यांचा जन्म उत्तर प्रदेशच्या मेरठ येथे झाला होता. कैलाश यांना गायनाचे बाळकडू घरातूनच मिळाले होते. त्यांचे वडील हे काश्मिरी पंडित होते. त्यांना लोकगीताची प्रचंड आवड होती. त्यामुळे कैलाश खेर यांना बालपणापासूनच संगीतात आवड निर्माण झाली. वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षापासून कैलाश यांनी गायनामध्ये एन्ट्री घेतली. आज ते बॉलिवूडचे यशस्वी गायक आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात या काही खास गोष्टी...

कैलाश यांचा गायनाचा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. त्यांनी जेव्हा गायनातच करिअर करण्याचे ठरवले होते, तेव्हा त्यांच्या घरातून त्यांना विरोध झाला होता. मात्र, तरीही ते त्यांच्या निर्णयावर ठाम होते. वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांनी गायनासाठी घर सोडले होते.

Kailash Kher
कैलाश खेर

सुरुवातीच्या काळात त्यांनी विविध ठिकाणी संगीताचे धडे घेतले. कधीकधी त्यांनी मुंबईच्या रस्त्यावर दिवस काढले. त्यानंतर त्यांनी मुलांना संगीताचे धडे देण्यास सुरुवात केली. यातून ते स्वत:चा उदरनिर्वाह करत असत. या दरम्यान ते खूप डिप्रेशनमध्ये गेले होते. त्यांना कोणतीही आशेची किरण दिसत नव्हती. पुढे १९९९ मध्ये त्यांनी हँडीक्राफ्ट बिझनेस सुरु केला होता. मात्र, यामध्येही त्यांना प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे ते आणखीनच निराशेच्या गर्तेत अडकले गेले. असे म्हटले जाते, की यावेळी त्यांनी आत्महत्येचाही विचार केला होता.

Kailash Kher
कैलाश खेर

२००१ साली त्याना गायनाच्या संधी मिळू लागल्या. त्यानंतर, संगीत दिग्दर्शक राम संपत यांनी त्यांच्या कठिण काळात त्यांना आधार दिला. त्यांना सुरुवातीला जाहिरातींमध्ये जिंगल गाण्याची संधी दिली. त्यांनी पेप्सी, कोका कोलासारख्या मोठ्या ब्रॅन्डसाठी गायलेल्या जिंगल्सला मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली.

Kailash Kher
कैलाश खेर

पुढे त्यांना चित्रपटात गायनाची संधी मिळाली. त्यांनी गायलेले 'अल्लाह के बंदे' या गाण्याने प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेतला. याच गाण्याने त्यांना सुरांचा बादशाह बनवले. पुढे त्यांनी 'या रब्बा', 'ओ सिकंदर', 'तुटा तुटा एक परिंदा', 'चांद सिफारिश', 'तेरी दिवानी', 'सैय्या', आणि 'बाहुबली'चे 'कौन है वो' यांसारखी गाणी गायली आहेत. या गाण्यांमुळे त्यांना बरीच लोकप्रियता मिळाली. त्यांना फिल्मफेअरचा बेस्ट मेल प्लेबॅक गायकाचा पुरस्कारही मिळाला होता. आत्तापर्यंत त्यांनी हिंदी चित्रपटांमध्ये ५०० पेक्षा जास्त गाणी गायली आहेत.

Kailash Kher
कैलाश खेर

#MeeToo मध्ये अडकले होते नाव
मध्यंतरी सोशल मीडियावर #MeeToo चळवळीचे वारे वाहत होते. यामध्ये अनेक दिग्गजांच्या नावाच्या खळबळजनक खुलासा झाला होता. कैलाश खैर यांच्यावरही गायिका सोना मोहापात्रा हिने गैरवर्तनाचे आरोप केले होते.

Intro:Body:

Entertainment

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.