ETV Bharat / sitara

'बाटला हाऊस'नंतर मुंबई सागामध्ये झळकणार जॉन अब्राहम, शुटिंगला सुरूवात - शूटआउट अॅट वडाला

'मुबंई सागा' चित्रपटात जॉनसोबत जॅकी श्रॉफ, सुनील शेट्टी, प्रतिक बब्बर, गुलशन ग्रोवर हे देखील भूमिका साकारणार आहेत.

'बाटला हाऊस'नंतर मुंबई सागामध्ये झळकणार जॉन अब्राहम, शुटिंगला सुरूवात
author img

By

Published : Aug 27, 2019, 8:49 PM IST

मुंबई - अभिनेता जॉन अब्राहमच्या 'बाटला हाऊस' चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर दमदार यश मिळाले आहे. आत्तापर्यंत या चित्रपटाने ७५ कोटीपेक्षा जास्त कमाई करत १०० कोटीकडे वाटचाल केली आहे. आता या चित्रपटानंतर जॉन 'मुंबई सागा' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आजपासूनच (२७ ऑगस्ट) या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे.

'मुबंई सागा' चित्रपटात जॉनसोबत जॅकी श्रॉफ, सुनील शेट्टी, प्रतिक बब्बर, गुलशन ग्रोवर हे देखील भूमिका साकारणार आहेत.

चित्रपटाचे निर्माते भूषण कुमार यांनी या चित्रपटाच्या सेटवरुन क्लॅपबोर्डचा फोटो शेअर करुन चित्रिकरणाला सुरुवात झाल्याची माहिती दिली आहे.

'मुंबईची मुंबई बनवण्याची तयारी सुरू', असे कॅप्शन त्यांनी या फोटोवर दिले आहे.

रोहित रॉय आणि अमोल गुप्ते या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. त्यांनी यापूर्वी 'काबिल', 'शूटआउट अॅट वडाला' आणि 'कांटे' यांसारख्या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. १९ जून २०२० रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.