मुंबई - अभिनेता जॉन अब्राहमचा 'बाटला हाऊस' चित्रपट यावर्षी १५ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यंदा स्वातंत्र्यदिनी बॉक्स ऑफिसवर ३ बिग बजेट चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. अक्षय कुमारचा 'मिशन मंगल', प्रभास-श्रद्धाचा 'साहो' आणि जॉनचा 'बाटला हाऊस' हे तीनही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार असल्याने बॉक्स ऑफिसवर शर्थीची चुरस निर्माण होणार आहे. या तीनही चित्रपटांची चाहत्यांना उत्सुकता आहे. अशातच जॉनच्या 'बाटला हाऊस' चित्रपटाचं नवं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे.
काही महिन्यांपूर्वीच जॉनचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला होता. हा चित्रपट 'बाटला हाऊस' प्रकरणावर आधारित आहे. सत्य घटनेवर आधारित असलेल्या या चित्रपटातून 'बाटला हाऊस'चा थरार पडद्यावर उलगडणार आहे. या चित्रपटाच्या नव्या पोस्टरमध्ये काही खास ओळी लिहिण्यात आल्या आहेत.
'एक घर आयडेटीफाय हुआ
एक साझिश रची गयी
एक फर्जी एन्काऊंटर की', या ओळींनी या पोस्टरकडे लक्ष वेधले आहे.
-
Confirmed for 15 Aug 2019... John Abraham in #BatlaHouse... Directed by Nikkhil Advani. #BatlaHouseTrailerOn10thJuly pic.twitter.com/IoP1abuJ0X
— taran adarsh (@taran_adarsh) July 6, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Confirmed for 15 Aug 2019... John Abraham in #BatlaHouse... Directed by Nikkhil Advani. #BatlaHouseTrailerOn10thJuly pic.twitter.com/IoP1abuJ0X
— taran adarsh (@taran_adarsh) July 6, 2019Confirmed for 15 Aug 2019... John Abraham in #BatlaHouse... Directed by Nikkhil Advani. #BatlaHouseTrailerOn10thJuly pic.twitter.com/IoP1abuJ0X
— taran adarsh (@taran_adarsh) July 6, 2019
निखील आडवाणी हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. तर, या चित्रपटाचा ट्रेलर १० जुलै रोजी प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
'बाटला हाऊस'च्या निमित्ताने जॉन आणि अक्षय कुमार दुसऱ्यांदा एकमेकांसमोर भीडणार आहेत. मागच्या वर्षी १५ ऑगस्टच्या दिवशीच दोघांचेही चित्रपट प्रदर्शित झाले होते. अक्षयचा 'गोल्ड' तर जॉनचा 'सत्यमेव जयते' या दोन्हीही चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळाला. आता यंदाही त्यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. मात्र, यावेळी प्रभासच्या 'साहो'ची दोन्हीही चित्रपटांना चांगलीच टक्कर बसणार आहे.