मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांची प्रतिमा उजळ करण्यासाठीच 'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटाची निर्मिती झाल्याची चर्चा आता जोर धरु लागलीय. येत्या ५ एपिलला हा सिनेमा रिलीज केला जाणार आहे. होळीच्या दिवशी या सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. त्यानंतर हा सिनेमा प्रचारकी थाटाचा असल्याचा आरोप सुरू झालाय. विशेष म्हणजे दिग्गज गीतकार आणि पटकथा लेखक जावेद अख्तर यांनी आपल्या नावाचा उल्लेख पोस्टरवर झाल्यामुळे धक्का बसला असल्याचे म्हटलंय.
Am shocked to find my name on the poster of this film. Have not written any songs for it ! pic.twitter.com/tIeg2vMpVG
— Javed Akhtar (@Javedakhtarjadu) March 22, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Am shocked to find my name on the poster of this film. Have not written any songs for it ! pic.twitter.com/tIeg2vMpVG
— Javed Akhtar (@Javedakhtarjadu) March 22, 2019Am shocked to find my name on the poster of this film. Have not written any songs for it ! pic.twitter.com/tIeg2vMpVG
— Javed Akhtar (@Javedakhtarjadu) March 22, 2019
जावेद अख्तर यांनी ट्विट करुन आश्चर्य व्यक्त केलंय. सिनेमाच्या क्रेडीट लिस्टमध्ये गीतकार म्हणून जावेद अख्तर यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आलाय. मात्र, त्यांनी यासाठी कोणतेही योगदान केलेले नव्हते.
जावेद यांनी ट्विटरवर लिहिलंय, ''सिनेमाच्या पोस्टरवर माझे नाव पाहून धक्का बसला. मी सिनेमासाठी कोणतेही गाणे लिहिलेले नाही.''
या सिनेमाचे दिग्दर्शन 'सरबजीत' आणि 'मेरी कोम'सारख्या यशस्वी सिनेमाचे दिग्दर्शक ओमंग कुमार यांनी केलंय. १२ एप्रिलला रिलीज होणारा हा चित्रपट एक आठवडा अगोदर म्हणजेच ५ एप्रिलला रिलीज करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपट प्रदर्शनाआधीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. काँग्रेसनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि डीएमके पक्षानं देखील मोदींच्या बायोपिकवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.