मुंबई - लेखक आणि गीतकार असलेले जावेद अख्तर यांनी 'घुंघट बंदी'चे विधान केल्यानंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली होती. मात्र, त्यानंतर आता त्यांनी ट्विटरवरुन स्पष्टीकरण दिले आहे.
'माझ्या विधानाचा गैरअर्थ घेतला जात आहे. मी असे म्हणालो होतो, की 'श्रीलंकेमध्ये सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन चेहरा झाकण्यावर बंदी घालण्यात आली असावी. मात्र, महिलांनी मजबुत बनने गरजेचे आहे. महिलांचा चेहरा झाकणे बंद व्हावे, मग तो बुरख्याने असो, किंवा राजस्थानची घुंघट प्रथा', असे जावेद यांनी आपल्या ट्विटमध्ये स्पष्ट केले आहे.
गुरूवारी (२ मे) जावेद अख्तर हे भोपाळच्या एका कार्यक्रमात आले होते. दरम्यान त्यांना श्रीलंकेत झालेल्या बुरखाबंदीबाबत मत विचारण्यात आले होते. यावर त्यांनी म्हटले होते, की 'बुरख्याबद्दल मला जास्त काही माहीत नाही. माझ्या घरातही बुरख्याची प्रथा नाही. श्रीलंकेत जो प्रतिबंध लावण्यात आला आहे, तो चेहरा सुरक्षेच्या दृष्टीने असावा. मात्र, आपल्या सरकारनेही राजस्थानमध्ये 'घुंघट बंदी'ची प्रथा सुरू करावी, असे ते म्हणाले होते.