मुंबई - जेम्स बॉन्डच्या सीरिजमधील २५ वा 'नो टाइम टू डाय' या चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू आहे. अभिनेता डॅनियल क्रेग या सीरिजमुळे जेम्स बॉन्ड या नावानेच लोकप्रिय आहे. त्यामुळे या चित्रपटाबाबत चाहते उत्सुक आहेत. सुरुवातीला हा चित्रपट ३ एप्रिलला प्रदर्शित होणार होता. मात्र, आता एकदिवस आधीच हा चित्रपट सिनेमागृहात झळकणार आहे.
'नो टाइम टू डाय' हा चित्रपट ३ एप्रिल एवजी आता २ एप्रिलला भारतात प्रदर्शित होणार आहे. यांशिवाय हिंदी भाषेसोबतच हा चित्रपट इंग्रजी, तमिळ आणि तेलुगू या भाषांमध्येही प्रदर्शित केला जाणार आहे. संपूर्ण आठवड्याचा चित्रपटाच्या कमाईसाठी फायदा व्हावा, यासाठी या चित्रपटाची नवी रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.
-
#JamesBond gets a new release date in #India... #NoTimeToDie will now release on Thursday, 2 April 2020... 4-day *extended* weekend... In #English, #Hindi, #Tamil and #Telugu. #JamesBond007 #Bond25 #BondJamesBond pic.twitter.com/51nhdCULJq
— taran adarsh (@taran_adarsh) February 23, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#JamesBond gets a new release date in #India... #NoTimeToDie will now release on Thursday, 2 April 2020... 4-day *extended* weekend... In #English, #Hindi, #Tamil and #Telugu. #JamesBond007 #Bond25 #BondJamesBond pic.twitter.com/51nhdCULJq
— taran adarsh (@taran_adarsh) February 23, 2020#JamesBond gets a new release date in #India... #NoTimeToDie will now release on Thursday, 2 April 2020... 4-day *extended* weekend... In #English, #Hindi, #Tamil and #Telugu. #JamesBond007 #Bond25 #BondJamesBond pic.twitter.com/51nhdCULJq
— taran adarsh (@taran_adarsh) February 23, 2020
डॅनियलने २००६ साली 'कसिनो रॉयल' मधून 'जेम्स बॉन्ड'च्या सीरिजमध्ये एन्ट्री केली होती. त्यानंतर त्याने 'क्वांटम ऑफ सोलेस', 'स्कायफॉल' आणि 'स्पेक्ट्रम' यामध्ये जेम्स बॉन्डची भूमिका साकारली होती. 'स्कायफॉल' या सीरिजने ब्रिटनच्या बॉक्स ऑफिसवर बरेच विक्रम रचले होते.
हेही वाचा -नवोदित दिग्दर्शकांना ऋषी कपूर यांनी दिला 'हा' सल्ला
आता 'नो टाइम टू डाय' या चित्रपटातून पुन्हा एकदा डॅनियल जेम्स बॉन्डच्या रुपात दिसणार आहे. या चित्रपटाचे नवे पोस्टरही प्रदर्शित करण्यात आले आहे. कॅरी फुकुनागा या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. जेम्स बॉन्डसोबतच बॉन्ड गर्ल्सचीही चर्चा पाहायला मिळते. 'नो टाइम टू डाय' मध्ये अना दे अमर्स ही बॉन्ड गर्ल बनणार आहे. तर, ऑस्कर विजेता अभिनेता रामी मालेक हा विलनच्या भूमिकेत झळकणार आहे. यांशिवाय, दाली बेनसाला आणि लॅशा लिंच या कलाकारांची देखील या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका पाहायला मिळणार आहे.
हेही वाचा -'इंडियन आयडल ११'च्या सेटवर परिक्षकांना अश्रु अनावर, पाहा 'ग्रँड फिनाले'चा प्रोमो